बोगस डॉक्टरचा काळा कारनामा: महिलांसोबत खेळला 'डॉक्टर डॉक्टर'चा खेळ; 80 क्लिप व्हायरल, 400 महिलांची पोलिसात तक्रार

कोल्हापूर जिल्ह्यात एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. कागल  (kagal)तालुक्यातील मुरगूडमध्ये ( Murgud)एका बोगस डॉक्टराने  (bogus doctor) काळा कारनामा केला आहे. उपचारासाठी आलेल्या महिलांचे लैंगिक शोषण करत त्याचे व्हिडिओ (Video) बनवले. यातील 70 ते 80  व्हिडिओ क्लिप व्हायरल (clip viral) झाल्या आहेत.

bogus doctor obscene behaviour with women;  80 clips viral
बोगस डॉक्टरकडून महिलाचं लैंगिक शोषण? 80 Clip Viral  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • उपचारासाठी आलेल्या महिलांचे लैंगिक शोषण ?
  • 400 महिलांनी निनावी पत्रातून डॉक्टरविरोधात केली तक्रार
  • बोगस डॉक्टरने आपल्या दवाखान्याचा प्रचार सोशल मीडियावर केला.

कोल्हापूर:  जिल्ह्यात एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.  कागल  (kagal)तालुक्यातील मुरगूडमध्ये ( Murgud)एका बोगस डॉक्टराने  (bogus doctor) काळा कारनामा केला आहे. उपचारासाठी आलेल्या महिलांचे लैंगिक शोषण करत त्याचे व्हिडिओ (Video) बनवले. यातील 70 ते 80  व्हिडिओ क्लिप व्हायरल (clip viral) झाल्या आहेत. या क्लिप व्हायरल झाल्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशनवर 400 महिलांनी तक्रार नोंदवली आहे. यासाठी महिलांनी पोलिसांना निनावी पत्र लिहिले आहे.  ( Kolhapur Crime : bogus doctor obscene behaviour with women;  80 clips viral, 400 women complain to police)

अधिक वाचा  : IAS टीना डाबीची छोटी बहीण रियाची कमाई वाचून येईल चक्कर

मिळालेल्या माहितीनुसार, कागल तालुक्यातील मुरगूड गावात या बोगस डॉक्टरने आपल्या दवाखान्याचा प्रचार सोशल मीडियावर करत होता. ही जाहिरात पाहिल्यानंतर स्थानिक नागरिक त्याच्याकडे उपचारासाठी जात होते. त्यात अनेक महिला आणि तरुणी होत्या. उपचारासाठी आलेल्या महिला आणि तरुणींसोबत फालतू चाळे केले.

अधिक वाचा  : धनंजय मुंडे पंकजाताईंचे करतील स्वागत, पण...

महिलांसोबत केलेल्या अश्लील कृत्याचे व्हिडिओ मोबाईलमध्ये शुट केले.विवस्त्र महिलांचे व्हिडिओ डॉक्टरने आपल्या लॅपटॉपमध्ये सेव्ह केले होते. पण लॅपटॉप खराब झाल्यामुळे त्याने तो दुरुस्त करण्यासाठी एका दुकानात दिला. त्यानंतर सोशल मीडियावर हे व्हिडिओ व्हायरल झाले. याप्रकारामुळे ग्रामस्थ संतपाले आहेत.पोलिसांनी यावर पटकन कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.  

दुरुस्तीसाठी लॅपटॉप दिल्यानंतर क्लिप व्हायरल 

बोगस डॉक्टरने लॅपटॉपमध्ये वेगवेगळ्या फोल्डरमध्ये क्लिप ठेवल्या होत्या. दरम्यान लॅपटॉप बिघडला आणि तो दुरुस्तीसाठी गेला तेव्हा या क्लिप व्हायरल झाल्या. या क्लिप गेल्या काही दिवसांपासून मुरगूड परिसरातील अनेकांच्या मोबाईल फोन आणि पेन ड्राईव्हवर फिरत होत्या. पण भीतीपोटी कोणीही तक्रार केली नाही.

अधिक वाचा  : सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर बनली निखत झरीन

मात्र शनिवारी 400 हून अधिक निनावी पत्रे समोर आली. पीडित महिलांनी हे पत्र एकाच वेळी शहरातील अनेकांना मेल केल्याने ही चर्चा रंगली. हे व्हिडिओ असलेले पेन ड्राईव्ह अज्ञात व्यक्तींच्या वतीने शहरातील प्रमुख राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांना पोस्टाने पाठवण्यात आले आहेत. तसेच कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

निनावी पत्रात काय म्हटले आहे? 

मुरगुडचे नाव आता वेगळ्या कारणासाठी गाजत आहे. येथील बोगस डॉक्टरने आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी आपल्या अश्लील चाळ्यांचे चित्रण करून मुरगुडीचे नाव बदनाम केलं आहे. डॉक्टर हा पेशंटच्या दृष्टीने देव माणूस असतो. परंतु, या बोगस डॉक्टरने आपल्या वैद्यकीय व्यवसायाच्या आडून हा गैरप्रकार करून या व्यवसायात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रात कलंक लावला आहे.

अधिक वाचा  : कोणत्या राशींवर महादेवाची असेल कृपा; जाणून घ्या राशीभविष्य

ही अवलाद आपल्या मुरगुडच्या भावी पिढीसाठी घातक आहे. सर्व देश महिला दिन साजरा करत महिलांचा सन्मान करून त्यांच्या मनात सुरक्षितेची भावना निर्माण करत आहे. त्यामुळे आपल्या मुरगुडमध्ये महिला सुरक्षित नाहीत असा संदेश या घटनेमधून जात आहे. अशा प्रकारचे अश्लील चाळे चित्रण करून ते जतन करून ठेवणाऱ्या विकृत अप्रवृत्तीस आपण सर्व मुरगुडकर कायमचा धडा शिकवूया.

जेणेकरून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा घटना आपल्या मुरगुडमध्ये होणार नाहीत याची खबरदारी आपल्यावर आहे. या बोगस डॉक्टरला पाठबळ देणाऱ्यांचा सुद्धा आपण सर्वजण कायमस्वरूपी बंदोबस्त करून मुरगूड शहरात महिला सुरक्षित आहेत असा संदेश सगळे पाठवूया.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी