डॉक्टर तरुणीची कोल्हापुरात आत्महत्या

Kolhapur Doctor Apurva Hendre Commit Suicide By Taking Injection Case Registered In Police Station : कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्रवीण हेंद्रे यांची कन्या डॉ. अपूर्वा हेंद्रे (Apurva Hendre) यांनी आत्महत्या केली.

Kolhapur Doctor Apurva Hendre Commit Suicide By Taking Injection Case Registered In Police Station
डॉक्टर तरुणीची कोल्हापुरात आत्महत्या  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • डॉक्टर तरुणीची कोल्हापुरात आत्महत्या
  • हाताच्या नसमध्ये इंजेक्शन टोचून घेऊन केली आत्महत्या
  • आत्महत्येचे कारण समजलेले नाही

Kolhapur Doctor Apurva Hendre Commit Suicide By Taking Injection Case Registered In Police Station : कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्रवीण हेंद्रे यांची कन्या डॉक्टर अपूर्वा हेंद्रे (Apurva Hendre) यांनी आत्महत्या केली. हाताच्या नसमध्ये इंजेक्शन टोचून घेऊन त्यांनी आत्महत्या केली. कोल्हापुरातील न्यू शाहूपुरी भागात त्यांचा मृतदेह आढळला. शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून शवविच्छेदनाचा व्हीसेरा राखून ठेवला आहे. आत्महत्येचे कारण समजलेले नाही. तपास सुरू आहे. 

सर्जन असलेल्या अपूर्वा मागील काही आठवड्यांपासून अस्वस्थ होत्या. याआधीही त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समजते. रात्री उशिरा घरी पोहोचलेल्या अपूर्वा एक वाजण्याच्या सुमारास पुन्हा घराबाहेर पडल्या. जाताना त्यांनी घराच्या मुख्य दाराला बाहेरून कडी लावली. हा प्रकार लक्षात येताच घरातले सदस्य घाबरले त्यांनी मदत मागवून दरवाजा उघडून घेतला आणि अपूर्वा यांचा शोध सुरू केला. शाहूपुरी पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. घरातले सदस्य आणि पोलीस असे सर्वजण शोधत असताना पहाटे न्यू शाहूपुरी परिसरातील एका रिक्षा स्टॉपजवळ अपूर्वा यांचा मृतदेह आढळला. त्यांनी हाताच्या नसमध्ये टोचलेले इंजेक्शन तसेच होते. इंजेक्शन टोचून घेतल्यावर घटनास्थळीच अपूर्वा कोसळल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. अपूर्वा सर्जन म्हणून खासगी हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजलेले नाही. पोलीस तपास सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी