Kolhapur Fire live updates: कोल्हापुरात केमिकल कंपनीला भीषण आग

Kolhapur Gokul Shirgaon MIDC Company Fire: कोल्हापुरात कंपनीला भीषण आग लागली आहे. 

Kolhapur Fire live updates
Kolhapur Fire live updates: कोल्हापुरात केमिकल कंपनीला भीषण आग 
थोडं पण कामाचं
  • कोल्हापूरात एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग
  • गोकुळ शिरगाव एमआयडीसीतील कंपनीला आग
  • संपूर्ण कंपनी आगीच्या भक्षस्थानी

Kolhapur fire live updates: कोल्हापुरात एका कंपनीला भीषण आग लागली आहे. कोल्हापुरातील गोकुळ शिरगाव एमआयडीसीतील एका कंपनीला भीषण आग लागली आहे. एमआयडीसीतील केमिकल कंपनीला ही भीषण आग लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. (Kolhapur gokul shirgaon midc company massive fire live updates in marathi)

कंपनीला आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या तसेच वॉटर टँकर घटनास्थळी आहेत.

हे पण वाचा : झोपण्यासाठी अशी खरेदी करा मऊ गादी, आयुष्याची होईल चांदी

ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती उपलब्ध झालेली नाहीये. मात्र, ही आग खूपच भीषण असल्याचं दिसून येत आहे. संपूर्ण केमिकल कंपनीला ही आग लागली असून आगीचे लोळ  आणि कंपनीतून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट उंचावर जाताना दिसून येत आहेत. 

हे पण वाचा : गोरे होण्यासाठी काय खावे? सौंदर्य वाढविण्यासाठी कामी येतील ही फळे

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गोकुळ शिरगाव एमआयडीसीतील केमिकल कंपनीला ही आग लागली. कंपनीतील गोडाऊनला सर्वप्रथम ही आग लागली आणि त्यानंतर आगीने संपूर्ण कंपनीला आपल्या विळख्यात घेतले. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, केमिकल कंपनीत विविध प्रकारचे केमिकल, रसायने असल्याने आग झपाट्याने पसरत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी