MLA Chandrakant Jadhav Death : कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं निधन

MLA Chandrakant Jadhav Death :कोल्हापूर (Kolhapur North) उत्तरचे काँग्रेसचे आमदार (Congress MLAs) चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांचे निधन झाले आहे. आजारपणामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैद्राबाद (Hyderabad) येथील एका रुग्णालयात (hospital) उपचार सुरू होते.

Kolhapur North MLA Chandrakant Jadhav passes away
कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं निधन   |  फोटो सौजन्य: फेसबुक
थोडं पण कामाचं
  • निवडणुकीच्या आधी काँग्रेसमध्ये प्रवेश करून जाधव हे एका महिन्यात आमदार म्हणून निवडून आले होते.
  • 2019 मध्ये शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांचा त्यांनी पराभव केला होता.

MLA Chandrakant Jadhav Death : कोल्हापूर (Kolhapur North) उत्तरचे काँग्रेसचे आमदार (Congress MLAs) चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांचे निधन झाले आहे. आजारपणामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैद्राबाद (Hyderabad) येथील एका रुग्णालयात (hospital) उपचार सुरू होते. सर्वच पक्षातील नेत्यांशी जाधव यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. निवडणुकीच्या आधी काँग्रेसमध्ये प्रवेश करून जाधव हे एका महिन्यात आमदार म्हणून निवडून आले होते. अतिशय मनमिळावू आणि लहान मुलांपासून वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सगळ्यांचे लाडके आण्णा म्हणून ते परिचित होते.राजकारणापेक्षा सामाजिक कार्यात ते अधिक व्यस्त असत.

गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र आज पहाटे त्यांची प्राणज्योत माळवली. आमदार चंद्रकांत जाधव यांना दीड वर्षात दोन वेळा कोरोना झाला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळत गेली. मध्यंतरी प्रकृती ठणठणीत झाल्याने ते पुन्हा आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय झाले होते. मात्र आठ दिवसांपूर्वी पुन्हा त्रास जाणवू त्यांना हैदराबादमध्ये दाखल करण्यात आले होते.निवडणुकीच्या आधी केवळ पंधरा दिवस काँग्रेसमध्ये प्रवेश करून 2019 साली त्यांनी शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांचा त्यांनी पराभव केला होता. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी