कोल्हापूर: आरोग्यमंत्री येताच प्रशासनाची धावपळ

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना प्रशासनाची धावपळ झाल्याचे बघायला मिळाले.

kolhapur shops reopen from monday 19 july 2021, covid19 situation is under control
कोल्हापूर: आरोग्यमंत्री येताच प्रशासनाची धावपळ 
थोडं पण कामाचं
  • कोल्हापूर: आरोग्यमंत्री येताच प्रशासनाची धावपळ
  • कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात
  • १०० दिवसांपासून बंद असलेली अनेक दुकाने सोमवारपासून पुन्हा खुली होतील

कोल्हापूर: महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना प्रशासनाची धावपळ झाल्याचे बघायला मिळाले. सरकारी बैठकीच्या ठिकाणी आरोग्यमंत्री पोहोचले तरी प्रमुख प्रशासकीय अधिकारी पोहोचले नव्हते. आरोग्यमंत्री हजर झाल्याचे कळल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांची धावपळ झाली. नव्याने पदभार स्वीकारलेले राहुल रेखावार, कोल्हापूर महापालिका आयुक्त कादंबरी बलकावडे, जिल्हा परिषद सीईओ संजय चव्हाण हे धावपळ करुन बैठकीच्या ठिकाणी पोहोचले. kolhapur shops reopen from monday 19 july 2021, covid19 situation is under control

शिष्टाचारानुसार मंत्रीमहोदय पोहोचण्याआधी बैठकीच्या ठिकाणी संबंधित प्रशासकीय अधिकारी योग्य त्या कागदपत्रांसह उपस्थित राहणे आवश्यक आहे. पण कोल्हापूरमध्ये राज्याचे आरोग्यमंत्री आले असताना प्रशासकीय अधिकारी जागेवर नव्हते. अखेर बैठकीशी संबंधित सर्वजण पोहोचल्यानंतर बैठक झाली. या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. 

कोरोना स्थिती नियंत्रणात असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील निर्बंध सोमवार १९ जुलै २०२१ पासून शिथील होणार आहेत. निर्बंधांमुळे १०० दिवसांपासून बंद असलेली अनेक दुकाने सोमवारपासून पुन्हा खुली होतील. यामुळे नागरिकांना तसेच छोट्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर खूप कमी असल्यामुळे निर्बंध शिथील करण्याचा निर्णय आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी