बर्थडे गिफ्ट मागणे भोवले, प्रियकराने केली प्रेयसीची हत्या

The lover killed his girlfriend through an immoral relationship : प्रियकराने गळा आवळून विवाहितेचा हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रियकराने हा खून अनैतिक संबंधातून केला असल्याची माहिती समोर आली आहे.

lover killed his girlfriend, sangli murder case
बर्थडे गिफ्ट मागणे भोवले, प्रियकराने केली प्रेयसीची हत्या  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • प्रियकराने अनैतिक संबंधातून केली महिलेची हत्या
  • महिलेचा येरळा नदी पात्रात पुलाजवळ एका महिलेचा मृतदेह आढळला होता
  • महिलेने १ ग्रॅम सोन्याची अंगठी मागितल्यावरून झाला होता दोघांमध्ये वाद

सांगली : प्रियकराने गळा आवळून विवाहितेचा हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रियकराने हा खून अनैतिक संबंधातून केला असल्याची माहिती समोर आली आहे. सदर घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांमध्ये अनैतिक संबंधातून होणाऱ्या हत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याचाच एक धक्कादायक प्रकार सांगलीत समोर आला आहे.

अधिक वाचा : स्टेट बँक ऑफ इंडियाची अन्युइटी डिपॉझिट योजना, पाहा फायदे

येरळा नदी पात्रात पुलाजवळ एका महिलेचा मृतदेह आढळला होता

भिकवडी खुर्द गावाच्या हद्दीत येरळा नदी पात्रात पुलाजवळ एका महिलेचा मृतदेह आढळला होता. याबाबत पोलिसांनी अधिक चौकशी केली असता प्रियकराने हत्या केल्याचं समोर आलं आहे. हत्या करणाऱ्या संशयित प्रियकराचे नाव राहुल सर्जेराव पवार असं आहे. तर, ताई सचिन निकम असं मृत महिलेचं नाव आहे. पोलीसांनी राहुल सर्जेराव पवार याच्या विरोधात कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, कडेगाव पोलिसांनी राहुल पवार या तरुणाला अटक देखील केली आहे.

अधिक वाचा : Moto G22 चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक, लवकरच होणार लॉन्च

मृत महिला हॉटेलमध्ये भाकरी, चपाती करण्याचे काम करायची

राहुल पवार आणि ताई निकम या दोघात सुमारे दीड वर्षापासून प्रेमसंबंध असल्याची माहिती राहुल पवारने पोलिसांना चौकशीदरम्यान दिली आहे. हे दोघे सतत एकमेकांना फोन देखील करत असल्याचं उघड झालं आहे. राहुल पवार हा व्यावसायिक होता. त्याचे ज्वेलर्सचे दुकान देखील होते. तर, ताई ही विटा इथं भाड्याच्या घरात राहत होती आणि हॉटेलमध्ये भाकरी, चपाती करण्याचे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.

अधिक वाचा : MBBS केलेल्यांना सरकारी वैद्यकीय सेवेसाठी काम करणे बंधनकारक 

असा झाला होता दोघांमध्ये वाद?

राहुल हा त्याच्या ज्वेलरीच्या दुकानात बसला होता. यावेळी ताई निकम त्या ठिकाणी आली आणि तिने तिचा वाढदिवस असल्या कारणामुळे राहुलकडे एक ग्रॅमची सोन्याची अंगठी गिफ्ट मागितली. मात्र, राहुलने ताई निकम या महिलेला सोन्याची अंगठी देण्यास नकार दिला. यानंतर महिलेने राहुलला धमकी दिली की, तू जर मला अंगठी दिली नाही तर आपल्या संबंधाबाबत त्याच्या वडिलांना सांगेन. यानंतर राहुल घाबरला आणि या दोघांमध्ये परत एकदा वाद झाला त्यानंतर गाडीतच ताई निकमच्या गळ्यातील ओढणीनेच तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह गाडीतून भिकवडी खुर्द गावाच्या हद्दीत येरळा नदी पात्रात पुलावरुन टाकून दिल्याचे राहुलने सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी