Maharashtra vehicles vandalised in Belgaon : महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात सुरू असलेला सीमावाद आता आणखी चिघळत असल्याचं दिसून येत आहे. कर्नाटकच्या सीमेवर महाराष्ट्रातील काही ट्रकवर हल्ला करण्यात आला. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण निर्माण झाली आहे. (Maharashtra Karnataka border dispute stone pelting in belgaon on Maharashtra passing trucks many vehicles vandalised)
बेळगावातील हिरेबागवाडी टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या गाड्या कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून अडवण्यात आल्या. त्यानंतर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून ट्रकवर हल्ला करण्यात आला. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या गाड्या अडवून आंदोलन सुरू केलं. महाराष्ट्रातील गाड्यांसमोर आडवे झोपून तसेच गाड्यांवर चढून कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
हे पण वाचा : कोणत्या राशीची व्यक्ती आपल्या भावना कशा प्रकारे लपवते? तुमची रास कोणती?
pic.twitter.com/ZyME9pQb9L — Times Now Marathi (@timesnowmarathi) December 6, 2022
पुण्याहून बंगळुरूकडे जात असताना महाराष्ट्रातील काही गाड्या कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून अडवण्यात आल्या. त्यानंतर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी या गाड्यांपैकी काही ट्रकवर दगडफेक केली. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या आंदोलनामुळे आता महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद आणखी चिघळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे पण वाचा : नववर्षात शनीदेव बनवणार शश राजयोग, या राशीच्या व्यक्तींचं नशीब फळफळणार
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवर बेळगावात कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील गाड्यांवर हल्ला केला. या प्रकरणानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना फोन केला. देवेंद्र फडणवीस यांनी घडलेल्या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध केला तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आश्वासन दिलं की, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.