Maharashtra Karnataka Border Dispute : बेळगावला जाण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते कोगनोळी टोलनाक्यावर आक्रमक, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड

Maharashtra Karnataka Border Dispute : कर्नाटक सीमेवर कन्नडिगांची दडपशाही सुरू असून बेळगावमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रातील नेते बेळगावला जाण्यासाठी आक्रमक झाले आहेत.

Maharashtra Karnataka Border Dispute
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत बेळगावात जाण्याचा निर्धार केला आहे.
  • बेळगावचे पोलीस उपायुक्त रविंद्र गाडादी यांनी काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
  • मेळाव्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नाही.

Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र कर्नाटक वाद वाढण्याची शक्यता अधिक गडद झाली आहे. बेळगावमध्ये (Belgaum) आज होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या (Maharashtra Ekikaran samiti) महामेळाव्याला मिळालेली परवानगी अचानकपणे नाकारण्यात आली आहे. कर्नाटक सीमेवर कन्नडिगांची दडपशाही सुरू असून बेळगावमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रातील नेते बेळगावला जाण्यासाठी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे कोगनोळी टोलनाक्यावर मोठी गर्दी झाली आहे. तेथून मोर्चा बेळगावला नेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.  (Mahavikas Aghadi leader Kognoli toll aggressive for go to Belgaon)

अधिक वाचा  : मोराला पिल्लं कशी होतात? लांडोर अश्रू पिवून गर्भवती होते?

आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत बेळगावात जाण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे कोगनोळी टोलनाक्यावर अभूतपूर्व बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात येण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. दरम्यान, खासदार आणि महाराष्ट्र सरकारच्या सीमाप्रश्नी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने  यांनाही बेळगावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याबाबत बेळगावचे जिल्हा दंडाधिकारी नितेश पाटील यांनी रविवारी आदेश काढला.  

अधिक वाचा  :  मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वऱ्हाडाच्या बसला भीषण अपघात

कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने उद्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बेळगावातील टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपो मैदानावर महामेळाव्याचे आयोजन केले होते. त्याची जय्यत तयारीही सुरु करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी अचानक मेळाव्याला परवानगी नाकारत दडपशाही करण्याचा प्रयत्न केला आहे.  बेळगावचे पोलीस उपायुक्त रविंद्र गाडादी यांनी काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

मेळाव्यासाठी कोणतीही परवानगी  देण्यात आली नाही. त्यासंदर्भात एकीकरण समितीला पत्र देखील देण्यात आले. मेळाव्यात कोणाताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी  परवानगी नाकारण्यात आल्याचे रविंद्र गाडादी यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी