कोल्हापुरात रामतीर्थजवळ सापडली मानवी कवटी

Man Skull found in Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे रामतीर्थ या पर्यटनस्थळाजवळ एक मानवी कवटी आढळली. विजेच्या खांबाजवळ कवटी आढळली.

Man Skull found in Kolhapur
कोल्हापुरात रामतीर्थजवळ सापडली मानवी कवटी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • कोल्हापुरात रामतीर्थजवळ सापडली मानवी कवटी
  • पोलिसांनी पंचनामा करून कवटी ताब्यात घेतली
  • कवटी वैद्यकीय तपासणीसाठी पाठविली

Man Skull found in Kolhapur : कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे रामतीर्थ या पर्यटनस्थळाजवळ एक मानवी कवटी आढळली. विजेच्या खांबाजवळ कवटी आढळली. पोलिसांनी पंचनामा करून ही कवटी ताब्यात घेतली आणि वैद्यकीय तपासणीसाठी पाठविली आहे. 

सुलगाव येथील तानाजी डोंगरे गावाच्या दिशेने जाताना विजेच्या खांबाजवळ मानवी कवटी आढळली. कवटी बघून लोकांनी घटनास्थळी गर्दी केली. कवटी एखाद्या भोंदूने ठेवली असावी अशी चर्चा सुरू होती. घटनास्थळी गर्दी वाढू लागताच पोलीस तिथे पोहोचले. पोलिसांनी कवटी पंचनामा करून ताब्यात घेतली आणि वैद्यकीय तपासणीसाठी पाठविली. कवटीची डीएनए चाचणी करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी