medha patkar targeted devendra fadanvis देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच नद्यांच्या पूररेषेचा गोंधळ, फडणवीसांवर मेधा पाटकरांची जोरदार टीका

medha patkar targeted devendra fadanvis : पर्यावरण अभ्यासक आणि चळवळीतील कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र ( ex cm Devendra Fadnavis) फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

medha patkar targeted devendra fadanvis
फडणवीसांवर मेधा पाटकरांची जोरदार टीका   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पूररेषा आणि नदीची पाणीपातळी यामधील फरक माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळाला नाही – मेधा पाटकर
  • नद्यांमधील गाळ आणि वाळू काढून खोलीकरण करणे हे पूर्णता अशास्त्रीय आहे.
  • पर्यावरणाची संरचना लक्षात घेऊन नियंत्रणासाठीचे शाश्वत उपाय अंगीकरण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे

medha patkar targeted devendra fadanvis कोल्हापूर : पर्यावरण अभ्यासक आणि चळवळीतील कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र ( ex cm Devendra Fadnavis) फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच नद्यांच्या पूररेषेचा गोंधळ (Kolhapur Flood Update) झाला असून नागरिकांना पुराचा फटका सहन करावा लागत असल्याचं मेधा पाटकर यांनी म्हटलं आहे. मेधा पाटकर यांनी केलेल्या या टीकेवर भाजपने अद्याप पर्यत कुठलीही प्रतिक्रिया दिली नसून येत्या काळात मात्र मेधा पाटकर विरोधात भाजप असा वाद निर्माण होऊ शकतो. दरम्यान, मेधा पाटकर या कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधत होत्या. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

पूररेषा आणि नदीची पाणीपातळी यामधील फरक माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळाला नाही – मेधा पाटकर

 दरम्यान, पुढे बोलताना मेधा पाटकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाना साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक पातळीवर जाऊन पर्यावरणासंदर्भात मोठमोठी वक्तव्य करत आहेत. मात्र त्याच वेळी देशात काय परिस्थिती सुरू आहेत याकडे मात्र दुर्लक्ष आहे, असं मेधा पाटकर म्हणाल्या. निळा आणि लाल रेषेतील बांधकामांना सरसकट सूट दिली. त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना पुराचा सामना करावा लागत आहे. पूररेषा आणि नदीची पाणीपातळी यामधील फरक माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळाला नाही. त्यामुळे त्यांनी क्रिडाईनं पूर रेषेच्या बाबतीत दिलेला अहवाल स्वीकारला. असं देखील मेधा पाटकर म्हणाल्या.

नद्यांमधील गाळ आणि वाळू काढून खोलीकरण करणे हे पूर्णता अशास्त्रीय आहे.

नद्यांमधील गाळ आणि वाळू काढून खोलीकरण करणे हे पूर्णता अशास्त्रीय असल्याचं पाटकर म्हणाल्या. यातून केवळ ठेकेदारांचे भले होणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा अशी मागणी मेधा पाटकर यांनी यावेळी केली. मेधा पाटकर पुढे बोलताना म्हणाल्या की, गेल्या दोन - तीन वर्षांपासून महापूराची तीव्रता वाढली आहे. या सर्वाला पूररेषेच्या बाबतीत बेजबाबदारपणे निर्णय घेणाऱ्या घेणारे देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. त्यामुळे किमान आतातरी पूर रेषेची नव्याने आखणी करणे गरजेचे आहे. अशी मागणी मेधा पाटकर यांनी केली आहे. 

पर्यावरणाची संरचना लक्षात घेऊन नियंत्रणासाठीचे शाश्वत उपाय अंगीकरण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे

दरम्यान, आता अभ्यासकांनी अधिक लक्ष घालून पर्यावरणाची संरचना लक्षात घेऊन नियंत्रणासाठीचे शाश्वत उपाय अंगीकरण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असं मेधा पाटकर यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर रायगड, चिपळून, कोल्हापूर आणि सांगली आलेल्या महापुराने भविष्यातील धोक्याचा इशारा दिला आहे.  केवळ सरकारच सर्व प्रश्न सोडवेल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. असही मेधा पाटकर यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी