Vinay Kore's shocking statement धक्कदायक कबुली ! महापौर करण्यासाठी एका नगरसेवकाला ३५ -३५ लाख दिले

MLA Vinay Kore's shocking statement : माझ्या पक्षाचा महापौर झाला. मात्र, लोकांचा माझ्याबद्दल पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. भावनेच्या भरात माझ्याकडून झालेली ही सर्वात मोठी चुक होती, अशी कबुली कोरे यांनी दिली

MLA Vinay Kore's shocking statement
धक्कदायक ! महापौर करण्यासाठी एका नगरसेवकाला ३५ -३५ लाख दिले   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • महापौर करण्यासाठी एका - एका नगरसेवकाला ३५ – ३५  लाख दिले होते
  • भावनेच्या भरात माझ्याकडून झालेली ही सर्वात मोठी चुक होती – विनायक कोरे
  • समन्वयाचं, विचाराच राजकारण आपणाला सुरु करता येईल का हा माझा प्रामाणिक प्रयत्न

 Vinay Kore's shocking statement कोल्हापूर : एखाद्या मोठ्या पदावर जाण्यासाठी नेते पैशांचा किंवा इतर गोष्टींचा विचार करत नसल्याचं आपण अनेक पहिले आहे. अशीच एक कबुली जनसुराज्य पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांनी दिली आहे. कोल्हापूरमध्ये माझ्या पक्षाचा महापौर करण्यासाठी एका - एका नगरसेवकाला ३५  लाख रुपये दिले अस असल्याचं आमदार विनय कोरे यांनी म्हटलं आहे. कोरे यांच्या या कबुलीनंतर मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोल्हापूरमधील विधान परिषदेची निवडणूक ही बिनविरोध झाली होती. त्याअनुषंगाने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना विनय कोरे यांनी ही हे धक्कादायक वक्तव्य केल आहे.   

भावनेच्या भरात माझ्याकडून झालेली ही सर्वात मोठी चुक होती – विनायक कोरे

माझ्या पक्षाचा महापौर झाला. मात्र, लोकांचा माझ्याबद्दल पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. भावनेच्या भरात माझ्याकडून झालेली ही सर्वात मोठी चुक होती, अशी कबुली कोरे यांनी दिली. त्यावेळी कोल्हापुरात महापौर करण्यासाठी एका - एका नगरसेवकाला ३५ – ३५  लाख दिले होते. काही वर्षांपूर्वी महादेवराव महाडिक आणि सतेज पाटील एकत्र होते. तर, मी आणि हसन मुश्रीफ एकत्र होतो. अस आमदार विनय कोरे यांनी म्हटले आहे. सर्वसामान्य लोकांच्या मनात राजकारणाबद्दल तिरस्कार निर्माण होईल, असे राजकारण बंद झाले पाहिजे, असेही कोरे यांनी म्हटले. जवळपास पंधरा वर्षापूर्वी आमदार कोरे आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी महापालिकेतील माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले. नगरसेवकांना आपल्याकडे खेचून महाडिकांची महापालिकेतील सत्ता संपुष्टात आणली होती. 

समन्वयाचं, विचाराच राजकारण आपणाला सुरु करता येईल का हा माझा प्रामाणिक प्रयत्न

समन्वयाचं, विचाराच राजकारण आपणाला सुरु करता येईल का हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून कोल्हापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मी प्रयत्न केला असेही विनय कोरे यांनी म्हटले.  विनय कोरे यांनी म्हटले की, बिनविरोध निवडणुकीचा पायंडा पाडला जात आहे, असे नाही. मर्यादित मतदार असलेल्या निवडणुकांमध्ये समन्वयाची भूमिका घ्यायला हवी अशीही भूमिका त्यांनी मांडली. 

वडगाव बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा

वडगाव बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार कोरे, आमदार प्रकाश आवाडे आणि माजी आमदार महादेवराव महाडिक, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी आणि भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची आघाडी झाली आहे. त्याचबरोबर वडगाव बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा रविवारी करण्यात आली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी