N. D. Patil Death : कोल्हापूर : एन.डी.पाटील अर्थात नारायण ज्ञानदे पाटील (Narayan Dnyande Patil) यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. ब्रेन स्ट्रोक (Brain stroke) आल्यानं गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूरमधील (Kolhapur) खासगी रुग्णालयात (Private Hospital) त्यांच्यावर उपचार सुरू होते. महाराष्ट्रातील विवेकी आवाज, पुरोगामी चेहरा, संघर्ष योद्धा, रचनात्मक लढाईचे निर्माते, सीमा लढ्याचा नेता, सेझविरुद्ध लढ्याचा कॅप्टन, रयत शिक्षण संस्थेचा चारित्र्यसंपन्न चेहरा असं ऑल राऊंडर व्यक्तीमत्व म्हणजे एन डी पाटील होते. नारायण ज्ञानदे पाटील यांना अख्या महाराष्ट्र एन. डी. या नावाने संपूर्ण महाराष्ट्र ओळखत होता. कष्टकरी, वंचित, कामगार, मोलकरणी अशा सर्वांसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. त्यांचा जन्म ढवळी (नागाव जि. सांगली) येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात झाला होता.
वयोमानानुसार एन. डी. पाटील यांचं शरीर थकलं होतं. त्यांना एक पाय आणि एका किडनीचा त्रास होता. मात्र कोणत्याही आंदोलनासाठी एन.डी. सर नेहमीच अग्रेसर असायचे. जिथे अन्याय, तिथे संघर्षाची त्यांची भूमिका होती. एन डी पाटील म्हणायचे, मी कोणत्याही आंदोलनासाठी एका पायावर आणि एका किडनीवर लढण्यासाठी सदैव तयार आहे. त्यांच्या या वाक्यांनी आंदोलकांना प्रेरणेचं बळ मिळायचं. आंदोलनाला यश मिळायचं.
संपूर्ण नाव : नारायण ज्ञानदेव पाटील
जन्म : १५ जुलै १९२९ – ढवळी ( नागाव ), जि.सांगली येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात जन्म
शिक्षण : एम.ए. ( अर्थशास्त्र ), पुणे विद्यापीठ,१९५५; एल.एल.बी.( १९६२ ) पुणे विद्यापीठ
१९५४- १९५७ छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर
१९६० साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज,इस्लामपूर येथे प्राचार्य
चेअरमनपद काळात : औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आश्रमशाळा,साखरशाळा,नापासांची शाळा,श्रमिक विद्यापीठ,संगणक शिक्षक केंद्र,कर्मवीर भाऊराव पाटील इन्फर्मेशन अॅण्ड टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट, ‘कमवा व शिका’ या योजनेवर भर ,स्पर्धा परीक्षा केंद्रे ,गुरुकुल प्रकल्प,लक्ष्मीबाई पाटील शिष्यवृत्ती योजना,सावित्रीबाई फुले दत्तक – पालक योजना यांची राबणूक,दुर्बल शाखा विकास निधी,म.वि.रा.शिंदे अध्यासन केंद्रे आदींची स्थापना,कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत विविध पुस्तकांची निर्मिती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी,समाजवादी प्रबोधिनी,अंधश्रद्धा निर्मुलन समिती या संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थी, शिक्षक –प्राध्यापक प्रबोधन कार्याला चालना.