मी आजवर फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री पाहिलेला नाही: अमित शहा

कोल्हापूर
Updated Oct 10, 2019 | 14:12 IST

Amit Shah: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगलीतील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंड भरुन कौतुक केलं आहे. आपण आजवर असा मुख्यमंत्री कधीही पाहिलं नसल्याचंही शहा यावेळी म्हणाले. 

national president of the bharatiya janata party amit shah too much praises about chief Minister devendra fadnavis
मी आजवर फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री पाहिलेला नाही: अमित शहा  |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • अमित शहांकडून मुख्यमंत्री फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव 
  • आजवर असा मुख्यमंत्री पाहिला नसल्याचं म्हणत फडणवीसांचं कौतुक
  • अमित शहा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर 

सांगली: 'मी आजवर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री पाहिलेला नाही. ते महाराष्ट्रासाठी प्रचंड काम करतात. त्यामुळे असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणं ही खूपच चांगली गोष्ट आहे.' अशा शब्दात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या सांगलीत प्रचार सभेत अमित शहा बोलत होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचं तोंड भरून कौतुक केलं. दरम्यान, 'मुख्यमंत्री रात्री १२ वाजता देखील मला महाराष्ट्राच्या विकासाच्या कामांसाठी फोन करतात.' असं देखील अमित शहा यावेळी म्हणाले. 

नेमकं काय म्हणाले अमित शहा: 

'मी आजवर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री पाहिलेला नाही. ते महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रचंड काम करत आहेत. जेव्हा रात्री १२ वाजता देखील माझा फोन वाजतो तेव्हाच मी समजतो की, हा फोन देवेंद्र फडणवीस यांचाच असणार. कारण फडणवीस हे सतत महाराष्ट्रासाठी काम करतात. उद्योग, शेती यासारख्या अनेक विषयांवर ते कामांविषीय सतत चर्चा करतात.' असं अमित शहा यावेळी म्हणाले. 
 
दरम्यान, सांगलीतील जत येथे घेतलेल्या जाहीर सभेत अमित शहा यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर बरीच टीका केली. सध्या भाजप आपल्या प्रचारात कलम ३७० हा मुद्दा प्रामुख्याने जनतेसमोर मांडत आहे. याचविषयी बोलताना अमित शहा यांनी असा आरोप केली की, 'कलम  ३७० रद्द होण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध होता.' याच मुद्द्यावरुन अमित शहांनी शरद पवार यांना प्रश्नही  विचारला. 

पाहा अमित शहा यांचं संपूर्ण भाषण:

'शरद पवारजी आपण कलम ३७० रद्द होण्याच्या बाजूने आहात की, नाही?' असा सवाल विचारत अमित शहांनी सांगलीत पवारांनाच टार्गेट केलं. 

यावेळी अमित शहांनी पवारांवर टीका देखील केली. 'तब्बल १५ वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होती. स्वत: पवार १० वर्ष केंद्रात सत्तेत होते. पण तरीही महाराष्ट्राचा विकास झाला नाही. पण आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रगती करत आहे. लवकरच महाराष्ट्र क्रमांक १ च्या दिशेने वाटचाल करत आहे. फडणवीस सरकारने शेती, उद्योगांसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला असून केंद्राने देखील वेळोवेळी महाराष्ट्रासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे.' असंही अमित शहा यावेळी म्हणाले.  

दरम्यान, राज्यभरात आज वेगवेगळ्या ठिकाणी भाजपच्या अनेक बड्या नेत्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भाजप मतदारांपर्यंत पोहचण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...