कोल्हापूर : काही महिन्यांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत पराभव झाल्यास हिमालयाला जाईल, असं वक्तव्य केले होते. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीने बाजी मारली आहे. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा १८,९०१ मतांनी विजय झाला आहे. त्यामुळे, भाजपच्या पराजयाची जबाबदारी थेट चंद्रकांत पाटील यांच्यावर असून, त्यांनी हिमालयात निघून जावं, असं म्हणत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजप प्रदेक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना हरिद्वारचे रेल्वे तिकिट काढून दिले आहे. चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या वक्तव्याची आठवण करुन देताना हरिद्वारचे तिकिट काढून दिले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजा राजापुरकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मुंबई ते हरिद्वार थ्री टायर एसी तिकीट काढलं आहे.
अधिक वाचा ; उत्तर कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस विजयी
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी एका सभेत बोलताना म्हटलं होत की, ‘मी मोदीजींकडून शिकलो आहे की, कोणी काहीही म्हणा आपण आपले काम करत पुढे जायचं. कोणी काहीही म्हणत की, हे कोल्हापूर मधून पळून आले. आपले आज चलेंज आहे की, ज्याला कोणाला असं वाटत त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कुठल्याही विधानसभेचा राजीनामा द्यायचा पोटनिवणूक लावायची निवडणून नाही आलो तर सरळ राजकारण सोडून हिमालयात निघून जाईन असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होत.
अधिक वाचा ; मनसेकडून भाजप नेत्यांना हनुमान चालीसा पुस्तकांची भेट
आता भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्विकारत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटलांनी आता तपश्चर्येसाठी हिमालयात जावं. त्याचबरोबर, हनुमानजयंतीच्या दिवशी हनुमानाची गदा कोल्हापूरकरांनी भाजपच्या डोक्यात मारल्याचं मिटकरी म्हटलं आहे. दरम्यान, मिटकरी यांनी कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयाबद्दल आनंद देखील व्यक्त केला आहे.
अधिक वाचा ; मुंबईसाठी आजचा सामना म्हणजे 'करो या मरो'
दरम्यान, पोटनिवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये आमदारकीचं खातं उघडण्याचं भाजपचं स्वप्न अधुरं राहिलं असल्याचं बोललं जात आहे. एकूण २६ फेऱ्यांमध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी पार पडली. जयश्री जाधव पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होत्या. मधल्या काही फेऱ्या वगळता त्यांनी आपली आघाडी कायम राखली. अखेर त्यांचा मोठा मताधिक्याने विजय झाला. जयश्री जाधव यांचा १८,९०१ मतांनी विजय झाला. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना मिळाला.