कौमार्य चाचणीत नवविवाहिता नापास झाल्याने जात पंचायतीने फांदी मोडून रद्द ठरवले लग्न

मूळच्या कोल्हापूरच्या असलेल्या कंजारभट समाजातील दोन तरुणींचा विवाह बेळगावचे रहिवासी असलेल्या दोन सख्ख्या भावांशी नुकताच झाला होता. पहिल्याच रात्री त्यांची कौमार्य चाचणी घेतल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे.

Bride
कौमार्य चाचणीत नवविवाहिता नापास झाल्याने जात पंचायतीने फांदी मोडून रद्द ठरवले लग्न  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • लग्नाच्या पहिल्याच रात्री घेतली कौमार्य चाचणी
  • अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने गुन्हा दाखल
  • सैन्यदलात असलेल्या नवऱ्या मुलाने दिली जीवे मारण्याची धमकी

कोल्हापूर: समाज (Society) म्हणून आपण 21व्या शतकात (21st century) जगत असलो तरीही आपल्या आजूबाजूला अनेक कुपरंपरा (ill traditions) आणि कालबाह्य झालेल्या प्रथा (outdated customs) पाहायला मिळतात आणि अनेक जण अशा प्रकारांमुळे भरडले जातानाही दिसतात. असाच एक प्रकार कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात उघडकीला आला आहे. इथल्या कंजारभट समाजातील (Kanjarbhat community) दोन मुलींचा विवाह (marriage) बेळगावच्या (Belgaum) दोन सख्ख्या भावांशी (two brothers) झाला होता. मात्र पहिल्याच रात्री त्यांची कौमार्य चाचणी (virginity test) घेण्यात आल्याचे आणि यात त्या नापास (fail) झाल्या म्हणून लग्न मोडल्याचा (marriage discarded) प्रकार समोर आला आहे.

लग्नाच्या पहिल्याच रात्री घेतली कौमार्य चाचणी

कोल्हापूरच्या कंजारभट या दोन्ही मुलींचा विवाह बेळगावातील दोन सख्ख्या भावांशी थाटामाटात पार पडला. मात्र लग्नाच्या पहिल्याच रात्री त्यांची कौमार्य चाचणी घेण्यात आली. कौमार्य चाचणी हा पूर्णपणे कालबाह्य झालेला, पण काही लोकांच्या मनात अद्याप घर करून असलेला अघोरी आणि अनिष्ट प्रकार आहे. मात्र हे प्रकरण इथेच थांबले नाही तर या दोन्ही नववधू या कौमार्य चाचणीत नापास झाल्याचा दावा केला गेला आणि म्हणून झाडाची फांदी मोडून जात पंचायत बोलावून हे लग्न प्रतीकात्मकरित्या मोडण्यातही आले.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने गुन्हा दाखल

21व्या शतकातही असा प्रकार घडल्याने कोल्हापूर आणि बेळगाव या सीमाभागात चांगलीच खळबळ उडाली आहे. तसेच या प्रथांना खतपाणी घालणाऱ्या आणि या नववधूंच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्या दोषींवर कारवाई करण्याचीही जोरदार मागणी होत आहे. घडला प्रकार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनाला आल्यानंतर संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सदर तरुणी आणि त्यांच्या आईला विश्वासात घेऊन राजारामपुरी पोलीसस्थानकात धाव घेतली असून अखेर या दोन्ही नवऱ्या मुलांविरोधात तिथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सैन्यदलात असलेल्या नवऱ्या मुलाने दिली जीवे मारण्याची धमकी

दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार या दोन नवऱ्या मुलांपैकी एकजण हा भारतीय सैन्यदलात आहे. त्याने आपल्या पत्नीला जीवे मारण्याची धमकीही दिली असल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. सध्या या दोन्ही तरुणी त्यांच्या माहेरी म्हणजेच कोल्हापुरातच वास्तव्यास आहेत. त्यांच्या सासरच्या लोकांनी त्या दोघी कौमार्य चाचणीत नापास झाल्याचा दावा करत जातपंचायतीच्या माध्यमातून त्यांना पत्नी म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आहे. आजच्या काळातही कौमार्य चाचणीसारख्या प्रथांचे पालन करणाऱ्या या कुटुंबियांवर कारवाई करण्याची मागणी जोमाने होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी