Gopichan Padalkar । उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलेल्या शब्दाची पडळकर यांनी अनिल परब यांना करून दिली आठवण 

Gopichan Padalkar । कुठल्याही युनियनचे सभासद फी भरली नाही. महसूलात घट आणली आणि त्यामुळेच शरदचंद्र पवार साहेबांना आज तुमच्या विषयाबद्दल खुलेआम तुमच्या सोबत चर्चा करण्यास भाग पाडले, याबद्दल विधान परिषदेचे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

Padalkar reminded Anil Parab of the words given by Uddhav Thackeray to the people of Maharashtra
गोपीचंद पडळकर यांचा अनिल परब यांना सल्ला   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कुठल्याही युनियनचे सभासद फी भरली नाही. महसूलात घट आणली
  • महसूलात घट आणली आणि त्यामुळेच शरदचंद्र पवार साहेबांना आज तुमच्या विषयाबद्दल खुलेआम तुमच्या सोबत चर्चा करण्यास भाग पाडले
  • विधान परिषदेचे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. 

Padalkar on ST Strike । सांगली : कुठल्याही युनियनचे सभासद फी भरली नाही. महसूलात घट आणली आणि त्यामुळेच शरदचंद्र पवार साहेबांना आज तुमच्या विषयाबद्दल खुलेआम तुमच्या सोबत चर्चा करण्यास भाग पाडले, याबद्दल विधान परिषदेचे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. (Padalkar reminded Anil Parab of the words given by Uddhav Thackeray to the people of Maharashtra)

Also Read : ​महाजन अडचणीत; जळगावातून पोलिसांनी कागदपत्रांनी भरला टेम्पो

गोपीचंद पडळकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला त्यात त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच ठाकरे सरकारमधील परिवहन मंत्री अनिल परब यांना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला दिलेल्या शब्दांची आठवण करून दिली.  

ते म्हणाले,  मला मंत्री अनिल परब यांना विनंती करायची की आपण हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून सगळे दरवाजे ठोठावत आहात त्यापेक्षा स्वत: आझाद मैदानात जाऊन आपल्याच मराठी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा का करत नाहीत? स्वत: भेटावं आणि ठामपणे आश्वासित करावं की बडतर्फीची कार्यवाही मागे घेण्यात येईल जेणेकरुन चर्चेचा मार्ग मोकळा होईल.  

Also Read : ​उद्धव ठाकरेंऐवजी फडणवीसांना मुख्यमंत्री करावे - आठवले

उद्धव ठाकरेंनी दिला होता हा शब्द 

 तसेच यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होतेच की मुंबईत कोणताही मोर्चा आला त्याला माझा मंत्री सामोरे जाईल. तर माझी ही विनंती नाही तर किमान उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलेल्या शब्दाचा तरी मान राखा आणि दोन पाऊल पुढे जाऊन आपुलकीने त्यांची  समजूत काढा,चर्चा करा आणि यावर तोडगा काढा, अशी प्रतिक्रिया पडळकर यांनी यात दिली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी