पार्थ पवार यांच्या आत्याने दिली प्रतिक्रिया म्हणाल्या...

Partha Pawar's aunt in Kolhapur reacted: सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या नातू पार्थ पवार यांना चांगलेच फटकारले होते.पवार म्हणाले होते,माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही

Partha Pawar's aunt in Kolhapur reacted
पार्थ पवार यांच्या आत्यांनी दिली प्रतिक्रिया म्हणाल्या...  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • इतक्या कठोर शब्दात ते कधीच बोलले नाहीत- विजया पाटील
  • आजोबा रागावलेलं वाईट निश्चितपणे वाटलं असेल
  • पार्थ वैयक्तिकरित्या भूमिका मांडू शकतो

कोल्हापूर: गेल्या २ दिवसांपासून चर्चेत असणारे पार्थ पवार (parth pawar) पक्षाशी विसंगत निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होत आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या कुटुंबातील सदस्य शनिवारी बारामती (baramati) येथे एकत्रितपणे भेटून पार्थ यांच्या विषयीचा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र पार्थ पवार यांच्या कोल्हापूर (kolhapur) येथील आत्या विजया पाटील यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना पार्थ पवार यांचं समर्थन केलं असून पार्थ पवार हे वैयक्तिकरित्या आपली भूमिका मांडू शकतात अस म्हंटल आहे.

काय म्हणाल्या पार्थ पवार यांच्या आत्या?

दरम्यान पार्थ पवार यांच्या कोल्हापूर येथील आत्या विजया पाटील यांनी देखील एका मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, सुप्रिया सुळे यांनी हा विषय माध्यमांसमोर मांडला होता की, पार्थ याची ही वैयक्तिक भूमिका होती. पार्थ पवार यांनी मांडलेली भूमिका ही राष्ट्रवादीच्या भूमिकेशी विसंगत असेल, अस पार्थ यांना वाटलं नसेल, मात्र वैयक्तिकरित्या तो भूमिका मांडू शकतो अस देखील त्या म्हणाल्या आहेत.

इतक्या कठोर शब्दात ते कधीच बोलले नाहीत- विजया पाटील

पार्थ पवार यांच्या आत्या विजया पाटील पुढे म्हणाल्या, पवार साहेबांना मी खूप लहानपणापासून आणि जवळून ओळखते. मात्र इतक्या कठोर शब्दांमध्ये त्यांनी कोणालाच बोललेल मला तर आठवत नाही. पवारांचं हे बोलण फक्त पार्थ यांनाच होत का? की आणखी कोणाला संदेश द्यायचा होता अस देखील त्यांनी म्हंटल आहे. दरम्यान त्यांना सर्वांनी गाडीत बसताना हा प्रश्न विचारला त्यामुळे ते बंडावून गेले असतील आणि म्हणून त्यांनी अस उत्तर दिले असेल अस त्या म्हणाल्या.

आजोबा रागावलेलं वाईट निश्चितपणे वाटलं असेल

प्रत्येकाच्या घरात आजोबाने रागावेला राग निश्चित येतो, तसाच राग पार्थला देखील आला असेल असं आत्या विजया पाटील म्हणाल्या आहेत. पार्थ आमच्या घरात हळवा आहे. तो प्रत्येकाच्या कार्यक्रमात जाऊन तो हजेरी लावत लावणारा एकमेव मुलगा आहे. तो प्रत्येकाशी विनयाने वागतो, त्यामुळे पार्थ यांना वाईट देखील निश्चित पणे वाटले असेल मात्र तो हे सर्व काही विसरून जाईल. अस पार्थ पवार यांच्या आत्या विजया पाटील म्हणाल्या आहेत.

पार्थ पवारांविषयी काय म्हणाले होते शरद पवार

दरम्यान शरद पवार यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या नातू पार्थ पवार यांना चांगलेच फटकारले आहे. पार्थ पवार यांच्या विषयी बोलताना शरद पवार यांनी म्हटलं, माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत नाही, त्यांचं वक्तव्य इमॅच्युअर आहे. माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे. दरम्यान पार्थ पवार यांना जरी शरद पवार यांनी फटकारले असेल, तरी त्यांनी सीबीआय चौकशीला विरोध नसल्याचंही म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी