मोठी बातमी; कोल्हापुरातील उद्याच्या आंदोलनात प्रकाश आंबेडकर होणार उपस्थित

PrakashAmbedkar will be present in the agitation in Kolhapur:प्रकाशआंबेडकर हे संभाजीराजे यांच्या नेतृत्वात होत असलेल्या आंदोलनात सहभागी होत असल्याने  ही राज्याच्या राजकारणातली मोठी घडामोड असल्याचे बोलले जात आहे

Prakash Ambedkar will be present in the agitation in Kolhapur
कोल्हापुरातील आंदोलनात प्रकाश आंबेडकर होणार उपस्थित   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत ट्वीटरवरून देण्यात आली माहिती
  • प्रकाश आंबेडकर यांच्या सहभागामुळे राज्यातील राजकारणाला नवी दिशा मिळण्याचे चिन्ह
  • राष्ट्रवादीचे नेतेही होणार सहभागी - अजित पवार

कोल्हापूर : येत्या १६ जून रोजी खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje) यांच्या यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी(maratha reservation) यांनी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. १६ जून रोजी कोल्हापूरमध्ये पहिला मूक आंदोलन करण्यात येणार असून, या आंदोलनाला आता वंचित बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी देखील पाठींबा देत, ते सहभागी देखील होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर हे संभाजी राजे यांच्या नेतृत्वात होत असलेल्या आंदोलनात सहभागी होत असल्याने  ही राज्याच्या राजकारणातली मोठी घडामोड असल्याचे बोलले जात आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत ट्वीटरवरून देण्यात आली माहिती

उद्या दि. १६ जून रोजी कोल्हापुरात मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी खा. संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मराठा आरक्षण मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत ट्वीटरवरून देण्यात आली आहे. 

प्रकाश आंबेडकर यांच्या सहभागामुळे राज्यातील राजकारणाला नवी दिशा मिळण्याचे चिन्ह

खुद्द प्रकाश आंबेडकर यांच्या सहभागामुळे राज्यातील राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहेत. विशेष म्हणजे, संभाजीराजे यांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. त्यातच प्रकाश आंबेडकर हे उद्याच्या मोर्चात सहभागी होत असल्याने येत्या काळात नेमक्या काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीचे नेतेही होणार सहभागी - अजित पवार

१६ तारखेला कोल्हापूरमध्ये मराठा समाजाचे मूक आंदोलन होणार आहे. उद्या पालकमंत्री, हसन मुश्रीफ तिकडे जाणार आहे. या आंदोलनात लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आंदोलनस्थळी जाणार आहोत. त्याचबरोबर कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे याचे भान सर्वांनी बाळगावे, असंही अजित पवार जाहीर केलं संभाजीराजे यांनी देखील कमीत कमी लोकांनी आंदोलनस्थळी याव असं आवाहन केलं आहे.

शाहू महाराजांच्या समाधीस्थळी मूक आंदोलन करण्यात येणार आहे

१६ जून रोजी कोल्हापूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन शाहू महाराजांच्या समाधीस्थळी करण्यात येणार असून, सदर आंदोलन हे मूक आंदोलन असणार आहे. खासदार संभाजीराजे यांनी मराठा आंदोलनासाठी कंबर कसली असल्याचे पहायला मिळाले आहे. दरम्यान, त्यांच्या उपस्थितीतचं हे आंदोलन होणार आहे. त्यानिमित्ताने आज आंदोलनाच्या तयारीसाठी कोल्हापूरमधील मराठा संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक नर्सरी बागेत आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीत एकच गोंधळ उडाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी