राज्यसभेसाठी भाजपने धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली, त्यामुळे कोल्हापुरातून राज्यसभेवर संजय की धनंजय चर्चा सुरु झाली, दोघे आहेत महाविद्यालयीन वयापासून एकमेकांचे मित्र

rajyasabha election ; fight between sanjay pawar and dhananjay mahadik : ४२ मतांसाठी अजूनही भाजपला १२ मतांची गरज आहे मात्र तरी देखील विजय आपलाच होईल असा विश्वास धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे.  महाडिक कुटुंबीयांना राजकीय वारसा खूप मोठा आहे तर गेले तीस वर्ष शिवसैनिक म्हणून रस्त्यावरची लढाई संजय पवार लढत आहेत.

rajyasabha election ; fight between sanjay pawar and dhananjay mahadik
राज्यसभेसाठी भाजपने धनंजय महाडिक यांना दिली उमेदवारी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारतीय जनता पार्टीकडून धनंजय महाडीक यांचा राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला
  • ४२ मतांसाठी अजूनही भाजपला १२ मतांची गरज
  • कोल्हापुरातून राज्यसभेवर संजय की धनंजय ही चर्चा सुरु झाली आहे

कोल्हापूर : महाविद्यालयीन वयापासून एकमेकांचे मित्र असणारे कोल्हापूर जिल्ह्यातील दोन दिग्गज नेते आता राज्यसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आता राज्यसभेच्या आखाड्यात दोस्तीत कुस्ती होणार हे नक्की आहे. भारतीय जनता पार्टीकडून धनंजय महाडीक यांचा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, राज्यसभेसाठी शिवसेनेकडून संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने राज्यसभेसाठी धनंजय महाडिक यांच्या रुपाने तिसरा उमेदवार दिल्याने कोल्हापूरला तिसरा खासदार मिळणार हे नक्की झालं आहे. कोल्हापूरमधून राज्यसभेसाठी शिवसेना आणि भाजपने आपले उमेदवार दिल्या या उमेदवारांची जोरदार चर्चा कोल्हापूरमध्ये सुरु झाली आहे.

अधिक वाचा ; टीव्हीची संस्कारी बहू झाली टॉपलेस, अंगावर घातलेय फक्त गुलाब

४२ मतांसाठी अजूनही भाजपला १२ मतांची गरज

काही दिवसापूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी आपला सहावा उमेदवार मागे म्हटले होत. असे असले तरी निर्णयाच्या बाबतीत महाविकास आघाडी आता खूप पुढे निघून गेली आहे. त्यामुळे सहाव्या जागेसाठी लढत होणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळेच कोल्हापुरातून राज्यसभेवर संजय की धनंजय ही चर्चा सुरु झाली आहे. ४२ मतांसाठी अजूनही भाजपला १२ मतांची गरज आहे मात्र तरी देखील विजय आपलाच होईल असा विश्वास धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे.  महाडिक कुटुंबीयांना राजकीय वारसा खूप मोठा आहे तर गेले तीस वर्ष शिवसैनिक म्हणून रस्त्यावरची लढाई संजय पवार लढत आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच कोल्हापूर हे केंद्रस्थाने राहिले आहे हे मात्र नक्की.

अधिक वाचा ; फक्त ऑरेंज कॅपच नाही तर जोस बटलरने जिंकले आणखी ६ अवॉर्ड

नेमकं कोण आहेत संजय पवार?

संजय पवार हे उच्चशिक्षित आणि संघटन कौशल्य असल्यानं पश्चिम महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये संजय पवार यांच्या नेतृत्त्वाची मोठी छाप आहे. संजय पवार हे गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय आहेत. सध्या पवार हे गेल्या ९ वर्षापासून शिवसनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख आहेत. शिवसैनिक ते नगरसेवक आणि त्यानंतर जिल्हाप्रमुख असा सेनेतील त्यांचा प्रवास. तसेच, एक कडवट शिवसैनिक म्हणून त्यांची पंचक्रोशीत ओळख आहे. यासोबतच, सिमा प्रश्नी आंदोलनताही तब्बल ३० वर्षे संजय पवार सहभागी आहेत. आण्णासाहेब पाटील महामंडळाचे ते उपाध्यक्ष आहेत. एवढंच नाहीतर, तीन वेळा कोल्हापूर महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले होते. स्थानिक राजकारणावर त्यांची मजबूत पकड आहे.

अधिक  वाचा ; विमान अपघातात ठाण्यातील चार जणांसह सर्व प्रवाशांचा मृत्यू 

नेमकं कोण आहेत धनंजय महाडिक?

 धनंजय महाडिक यांनी युवा शक्तीच्या माध्यमातून तरुणांचे संघटन केलं. त्या माध्यमातून जिल्हाभर त्यांनी युवकांचे जाळे उभारले. २००४ साली धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून लोकसभा लढले होते. पण त्यावेळी राष्ट्रवादीच्या सदाशिवराव मंडलिक यांच्याकडून त्यांना केवळ १२ हजार मतांनी पराभव पत्करावा लागला. २०१९ सालच्या निवडणुकीआधीच धनंजय महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी चंद्रकात पाटील यांनी प्रयत्न केला होता. अखेर तो योग निवडणुकीनंतर जुळून आला आणि धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपने त्यांना प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. धनंजय महाडिक हे एकेकाळचे काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे पुतणे आहेत. महादेवराव महाडिक यांचा त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर एकहाती वर्चस्व होतं. त्याचा फायदा धनंजय महाडिकांना झाला आणि महाविद्यालयीन वयापासूनच ते सामाजिक कार्यात सक्रिय राहिले. २०१४ साली देशभरात मोदी लाट असताना देखील धनंजय महाडिक खासदार म्हणून लोकसभेतदेखील पोहोचले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी