स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकरांची अवघ्या 20 दिवसात घरवापसी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर अवघ्या अठरा दिवसातच पुन्हा घरवापसी केली आहे. 20 दिवसांपूर्वी त्यांनी शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी दिली होती.

Raju shetty and ravikant tupkar
रविकांत तुपकरांची अवघ्या 20 दिवसात घरवापसी  |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर अवघ्या अठरा दिवसातच पुन्हा घरवापसी केली आहे.
  • 20 दिवसांपूर्वी त्यांनी शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी देत राज्यातले मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती सेनेमध्ये प्रवेश केला होता.
  • तुपकरांना माजी खासदार आणि शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे खंद्दे समर्थक मानले जाते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर अवघ्या अठरा दिवसातच पुन्हा घरवापसी केली आहे. 20 दिवसांपूर्वी त्यांनी शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी देत राज्यातले मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती सेनेमध्ये प्रवेश केला होता. तुपकरांना माजी खासदार आणि शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे खंद्दे समर्थक मानले जाते. आज राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा तुपकरांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला आहे. तुपकरांच्या घरवापसीमुळे भाजपचे मित्रपक्ष असलेल्या सदाभाऊ खोत यांना निवडणुकीच्या तोंडावर मोठा झटका बसला असल्याचं बोललं जात आहे. 

रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांच्याकडे 26 सप्टेंबरला राजीनामा दिला होता आणि 28 सप्टेंबरला सदाभाऊ खोत यांच्या संघटनेत प्रवेश केला. त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर रविकांत तुपकर यांनी राजीनामा दिल्यामुळे राजू शेट्टी यांना मोठा धक्का बसला होता असं म्हटलं जातं होतं.  रविकांत तुपकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून राजू शेट्टी यांच्या सोबत राहून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. तुपकरांची घरवापसी झाल्यानंतर राजू शेट्टी यांची ताकद पुन्हा एकदा वाढली आहे. 

घरवापसी केल्यानंतर रविकांत तुपकर म्हणाले की, पक्ष सोडून तिकडे जाणं माझी चूक होती. त्याबद्दल शेतकऱ्यांची मी माफी मागतो. चळवळीतला कुठलाही कार्यकर्ता उभा असेल तर त्याच्याविरूद्ध प्रचार करणार नसल्याचं मी सुरूवातीपासूनच सांगितलं होतं. माझा राजू शेट्टी यांच्यासोबत कधीही वाद नव्हता. काही अंतर्गत वाद होते ते आम्ही आता मिटवले असल्याचं तुपकरांनी म्हटलं होतं. असं म्हटलं जातं होतं की, बुलडाण्यातील चिखली मतदारसंघातून ते निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं जातं होतं. मात्र त्यांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्यावर अट घालण्यात आली होती. रविकांत तुपकरांच्या प्रवेशानंतर राजू शेट्टींनी स्पष्ट केलं की, तुपकरांनी कुठलीही अपेक्षा न करता पुन्हा प्रवेश केला असून तिकडे पाठवण्याची खेळी वगैरे नव्हती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी