मुंबई : राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीपूर्वी (Rajya Sabha Election) भारतीय जनता पार्टीला (BJP) सोडचिठ्ठी देत 'स्वराज्य' पक्षाची स्थापना केली आहे. दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुक पोस्ट करत महाराष्ट्रातील जनतेला 'स्वराज्य' पक्षाला बोधचिन्ह सूचवण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे आता स्वराज्य पक्षाचं बोधचिन्ह जनतेच्या कल्पनेतून साकारणार असल्याचं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मिडिया वरती पोस्ट करत हे आवाहन केल आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी केलेल्या आवाहनाला जनतेकडून देखील चांगला पाठींबा मिळत असल्याचे पहायला मिलत आहे.
अधिक वाचा : फाटलेली-जुनी पर्स फेकताय? त्याआधी करा हे काम, व्हाल मालामाल
स्वराज्यचे बोधचिन्ह सर्वांच्या कल्पनेतून साकारावे...विस्थापित मावळ्यांना संघटीत करून जनतेच्या मनातलं 'स्वराज्य' आणण्यासाठी "स्वराज्य" संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेचे अधिकृत बोधचिन्ह ( लोगो ) जनतेच्याच संकल्पनेतून साकारावे, अशी आमची इच्छा आहे. हे बोधचिन्ह सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करणारे असे स्वराज्य संघटनेची ओळख असेल. तरी, कल्पक मंडळींना आमचे आवाहन आहे की, असे बोधचिन्ह तयार करून खाली दिलेल्या व्हॉट्स ॲप नंबर वरती पाठवून द्यावे. ज्यांनी तयार केलेले बोधचिन्ह 'स्वराज्य'चे अधिकृत बोधचिन्ह म्हणून स्वीकारले जाईल, त्यांस छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते मानपत्र व मानचिन्ह देऊन सन्मानित केले जाईल. अशी पोस्ट संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.
अधिक वाचा : घरातील कुटुंबप्रमुखाकडे हे गुण असणे खूप आवश्यक, वाचा सविस्तर
१ ) बोधचिन्ह हे लक्षवेधी व संस्मरणीय असावे. ते फार क्लिष्ट असू नये.
२ ) बोधचिन्ह हे रेडियम प्रिंट, ग्राफिक प्रिंट अशा कोणत्याही स्वरूपात वापरण्यास सोयीस्कर असावे.
३ ) एकदा बोधचिन्ह स्वीकृत केल्यानंतर त्यावर पूर्ण अधिकार हा स्वराज्य संघटनेचा असेल.
४ )एखाद्या बोधचिन्हाची संकल्पना आवडल्यास ते स्वीकृत केल्यानंतर, त्यामध्ये कोणतेही बदल करण्याचे अधिकार स्वराज्य संघटनेकडे असतील.
५ ) कृपया जास्तीतजास्त सोमवार, दि. २० जून पर्यंत बोधचिन्ह पाठवून सहकार्य करावे.
अधिक वाचा : २ दिवसांच्या कालावधीमध्ये २ ग्रह बदलणार राशी, वाचा सविस्तर