मुसळधार पावसाने सांगलीत पुराचा धोका, कृष्णा आणि वारणेच्या पाणीपातळीत मोठी वाढ

गेल्या दोन दिवसांपासून सांगली जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.

Sangli have fear of flood  Panchaganga at 39ft alert mark, many start relocating in kolhapur
सांगलीला पुराचा धोका, पंचगंगेची पाणीपातळी वाढली  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  •  गेल्या दोन दिवसांपासून सांगली जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.
  • सांगलीजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी २० फूट झाल्याची नोंद करण्यात आली.
  • महाराष्ट्रातील विविध भागात जसा पावसाने जोर धरला तसाच जोर  कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाने धरला आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलंडण्यास सुरुवात केली आहे.

सांगली :  गेल्या दोन दिवसांपासून सांगली जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. सांगलीजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी २० फूट झाल्याची नोंद करण्यात आली.  या वाढलेल्या पाणी पातळीमुळे सांगलीच्या नदीकाठच्या भागात पुराचा धोका निर्माण झाला आहे.  दोन दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे वारणा धरण ८१ टक्के भरल्याची माहिती पाठबंधारे खात्याकडून देण्यात आली आहे. 

शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरात जोरदार पाऊस कोसळत असल्याने  वारणा धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. वारणा नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे काखे मांगले आणि कोकरूड रेठरे हे दोन पुल पाण्याखाली गेले असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.  

असा जोरदार पासून कायम राहिला तर वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु केला जाऊ शकतो, त्यामुळे वारणा नदी काठच्या गावकऱ्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. 

दुसरीकडे, महाराष्ट्रातील विविध भागात जसा पावसाने जोर धरला तसाच जोर  कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाने धरला आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलंडण्यास सुरुवात केली आहे. धोक्याची पातळी गाठण्यासाठी पंचगंगेला केवळ दोन फूट बाकी आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी ४१ फूट २ इंचावर असल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने केली आहे.  जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून कोल्हापूर जिल्ह्यातील १०२ बंधारे पाण्याखाली आहेत. तर राधानगरी धरणाचे स्वयंचलीत दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी