N. D. Patil Death : कोल्हापूर: राज्याच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेते (Senior Leader) प्राध्यापक (Professor) एन.डी.पाटील ( N. D. Patil) यांचं निधन (passed away) झालं आहे. ते 93 वर्षांचे होते. कोल्हापुरातील (Kolhapur) खासगी रुग्णालयात (Private Hospital) उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रेन स्ट्रोक आल्याने गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. एन.डी. पाटील यांच्या निधनामुळं राज्याच्या सामाजिक,राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्व हरपलं असून कोल्हापूरसह राज्यावर शोककळा पसरली आहे.
डॉ.अशोक भूपाळी (Dr. Ashok Bhupali) यांनी एन.डी. पाटील यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती. एन.डी. पाटील सर 8 वर्ष आपल्याकडे उपचार घेत आहेत. त्यांची एक किडनी काढली आहे, 11 जानेवारीला त्यांचं बोलणं बंद झालं, त्याच दिवशी काही तपासणी करून त्यांना अॅडमिट केलं गेलं होत, अशी माहिती डॉ. अशोक भूपाळी यांनी दिली होती. ऍडव्हान्स ट्रीटमेंट देऊन त्रास होईल, असे उपचार करू नयेत अशी त्यांची इच्छा होती, त्यामुळे कोणताही मोठी उपचार केले नाहीत, असं डॉ. भूपाळी म्हणाले होते. गेल्या चार दिवसांपासून पासून त्यांची शुद्ध हरपली होती. मेंदू बऱ्याच अंशी निकामी झाला होता, असं डॉ. अशोक भूपाळी म्हणाले.
वातावरणात बदल झाल्याने त्यांना थोडी कणकण वाटत होती. त्यामुळे एन.डी. पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र या वयातही एन. डी. पाटील यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती. मात्र यावेळी त्यांची मृत्यूची झुंज अपयशी ठरली. एक झुंजार नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. कामगार, शेतकरी यांचे अनेक प्रश्न त्यांनी सातत्यानं मांडले होते. तसेच अनेक प्रश्न त्यांनी मार्गीही लावले होते.
प्रा. एन. डी. पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य पुरोगामी चळवळीसाठी खर्च केलं. 15 जुलै 1929 रोजी सांगली येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात एन. डी. पाटील यांचा जन्म झाला होता. नारायण ज्ञानदेव पाटील असे त्यांचे पूर्ण नाव असून 15 जुलै 1929 ला सांगली जिल्ह्यातील ढवळी (नागाव) येथे शेतकरी कुटुंबात एन. डी. पाटील यांचा जन्म झाला. पहिल्यापासूनच शिक्षणाची आवड असणाऱ्या एन. डी. पाटील यांनी अर्थशास्त्र विषयातून एम.ए ची पदवी घेतली. त्यानंतर पुणे विद्यापीठातून एल.एल.बी चे शिक्षण पूर्ण केलं होतं.