ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर शिवसैनिक आक्रमक, राज्यपालांना काढला भल्ला मोठा कोल्हापुरी जोडा!

Shiv Sena workers protest : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात निदर्शने केली. त्यावेळी त्यांनी कोल्हापूरी चप्पल काढून राज्यपालांचा निषेध केला.

Shiv Sena party workers held a protest against state Governor in Kolhapur
ठाकरेंच्या आदेशानंतर शिवसैनिक आक्रमक, राज्यपालांना काढला भल्ला मोठा कोल्हापुरी जोडा! ।   |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे मराठी माणसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य
  • उध्दव ठाकरेंनी घेतली खसपूस समाचार
  • कोल्हापूरात शिवसैनिक आक्रमक

कोल्हापूर : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या मुंबईबाबत काढलेल्या वक्तव्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन खरपूस समाचार घेतला आहे. राज्यपालांनी आतापर्यंत महाराष्ट्राची चांगली बाजू पाहिली आहे. पण त्यांना आता कोल्हापूरी जोडा दाखवायची वेळ आली आहे, असा इशारा दिल्यानंतर कोल्हापूरातील शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली. शिवसैनिकांनी मिरजकर तिकटी परिसरात निदर्शने केली. यावेळी शिवसैनिकांनी आणलेल्या भल्यामोठ्या कोल्हापुरी चप्पलने सगळ्यांचे लक्ष वेधले. (Shiv Sena party workers held a protest against state Governor in Kolhapur)

अधिक वाचा : Uddhav Thackeray Mumbai: 'राज्यपाल कोश्यारींना कोल्हापुरी जोडे दाखवा', उद्धव ठाकरेंची जहरी टीका

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात बोलताना राजस्थानी आणि गुजरातींना मुंबईतून गेल्यास पैसाही उरणार नाही आणि मुंबईला आर्थिक राजधानी म्हणता येणार नाही., असे कोश्यारी यांनी शुक्रवारी म्हटले होते. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला.

अधिक वाचा : Bhagat Singh Koshyari: मला शिव्या घालाव्याशा वाटतात, इतका नालायक माणूस राज्यपाल आहे हे महाराष्ट्राचं दुर्दैव: जितेंद्र आव्हाड

ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राचे संस्कार, परंपरा, अनेक गोष्टी महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात सुंदर लेणी आहेत, पर्वत आहेत, शिवराय, गडकिल्ले आहेत, महाराष्ट्रात पैठणी (पैठणी साडी) आहे, महाराष्ट्रात काही पाककृती आहेत, ते सगळे गेल्या अडीच वर्षात पाहिले असेल. सगळ्या चांगल्या गोष्टी पाहिल्या असतील, पण कोल्हापूरची जोडा (चप्पल) पाहिला नसेल. त्यांना कोल्हापूरचा 'वाहणा' कुणाला तरी दाखवावी. कारण कोल्हापूरचे वाहन हेही महाराष्ट्राचे वैभव आहे.

अधिक वाचा :राज्यपालांचे हस्ते झालेले चौकाचे नामांतर अनधिकृत?

ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर शहरातील मिरजकर तिकटी परिसरात शिवसैनिकांनी राज्यपालांविरोधात जोरदार निदर्शने केली. यावेळी शिवसैनिकांनी आणलेल्या भल्यामोठ्या कोल्हापुरी चप्पलने सगळ्यांचे लक्ष वेधले. यावेळी राज्यपालांविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून सोडला होता. 

अधिक वाचा :किरीट सोमय्या पुन्हा अ‍ॅक्टिव्ह, 'या' माजी मंत्र्यावर 300 कोटींचा घोटाळ्याचा आरोप

नवीमुंबईत जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे जोडे मारो आंदोलन केले. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठे आंदोलन केले, यावेळी भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तर त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी