Shivsainik's agitation : शिवसैनिकांचे उग्र आंदोलन, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला

Shivsainik's burned karnataka CM statue : शिवसैनिकांनी आज उग्र आंदोलन केले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर शिवसैनिकांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा निषेध म्हणून शिवसैनिकांनी आंदोलन केले. 

Shivsainik's burned karnataka CM statue
शिवसैनिकांचे उग्र आंदोलन, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला 
थोडं पण कामाचं
  • शिवसैनिकांचे उग्र आंदोलन, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला
  • महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर घडली घटना
  • सांगली जिल्ह्यातील शिवसैनिकांचे आंदोलन

Shivsainik's burned karnataka CM statue : सांगली : शिवसैनिकांनी आज उग्र आंदोलन केले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर शिवसैनिकांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा निषेध म्हणून शिवसैनिकांनी आंदोलन केले. 

कर्नाटकमध्ये बंगळुरूत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाली. या घटनेचा निषेध करण्यासाठी शिवसैनिक दररोज आंदोलन करत आहेत. आज सांगली जिल्ह्यातील शिवसैनिकांनी उग्र आंदोलन केले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर शिवसैनिक गोळा झाले. त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यानंतर शिवसैनिकांनी बोम्मई यांचा पुतळा जाळला. बोम्मई यांच्या पुतळ्यासोबतच शिवसैनिकांनी कन्नड रक्षिका वेदिका संघटनेच्या ध्वजाचे दहन केले. 

शिवसैनिकांनी उग्र आंदोलन करताच तणावाचे वातावरण निर्माण झाले. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या पोलिसांनी सीमावर्ती भागात आपापल्या हद्दीत कडेकोट बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. 

याआधी भारताचे सहकारमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर येण्याआधी बंगळुरूत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाली. यानंतर महाराष्ट्रात कर्नाटक सरकारचा निषेध करणारे आंदोलन सुरू झाले. शिवसैनिकांनी दररोज आंदोलन सुरू केले. महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशनाची लगबग सुरू असताना आज शिवसैनिकांनी उग्र आंदोलन केले आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी