पुणे-बंगळुरु हायवेवर भीषण अपघात, ६ जणांचा जागीच मृत्यू 

कोल्हापूर
Updated Sep 12, 2019 | 13:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

Satara Bus Accident: साताऱ्यातील पुणे-बंगळुरु महामार्गावर एका खासगी बस आणि ट्रकच्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

 bus accident_ANI
पुणे-बंगळुरु हायवेवर भीषण अपघात, ६ जणांचा जागीच मृत्यू  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • साताऱ्यातील पुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात
  • खासगी बस आणि ट्रकच्या अपघातात ६ जणांचा मृत्यू
  • अपघातात २० जण जखमी, जखमींवर उपचार सुरु

सातारा: पुणे-बंगळुरु महामार्गावर आज (गुरुवार) सकाळच्या दरम्यान एक भीषण अपघतात तब्बल ६ जणांचा मृत्यू झाला असून जवळजवळ २० जण जखमी झाले आहेत. एका खासगी बसने ट्रकला धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस ही कर्नाटकमधील आहे. 

सकाळी आठ वाजेच्या सुमारास एक खासगी बस ही पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने जात अचानक हा अपघात झाला. प्रत्यक्षदर्शीच्या मते, या बसच्या पुढे एक मालवाहू ट्रक जात होता पण अचानक या ट्रकचा टायर फुटल्याने ड्रायव्हरने ट्रकवर नियंत्रण मिळविण्यासाठी तो रस्त्याच्या मधोमधच थांबवला. पण अचानक ट्रक रस्त्याच्या मध्येच थांबल्याने बस चालकाला मात्र आपली बस आवरता आली नाही. त्यामुळे बसची जोरदार धडक ट्रकला बसली. त्यामुळे हा भीषण अपघात झाला. हा अपघात साताऱ्यातील महामार्गानजीक असलेल्या डी-मार्टजवळच झाला. 

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले सहाही जण कर्नाटकचे नागरिक असल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. या संपूर्ण दुर्घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक ही काळ विस्कळीत झाली होती. पण नंतर अपघातग्रस्त बस आणि ट्रक बाजूला हटवण्यात आलं. त्यामुळे आता वाहतूक सुरळीत झाली आहे. 

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी पुण्यातील पिरंगुट घाट येथे झालेल्या भीषण अपघातात ३ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. यावेळी एका भरधाव ट्रकने काही वाहनांना धडक दिली होती. ज्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला होता. तर दोन जण गंभीर जखमी झाले होते. धडक देणारा ट्रक ड्रायव्हर हा दारूच्या नशेत असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या ड्रायव्हरला अटक करुन त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल केला आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...