Somvati Amavasya 2023 Somvati Yatra at Jejuri Gad Khandoba Darshan : महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या पंचांगानुसार आज (20 फेब्रुवारी 2023) माघ अमावस्या आहे. माघ अमावस्या या तिथीला द्वापारयुगादी अमावस्या असेही म्हणतात. यंदा माघ अमावस्या सोमवारी येत आहे आणि सोमवारी असणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असेही म्हणतात.
सोमवती अमावस्या या तिथीला जेजुरीच्या खंडोबाच्या गडावर सोमवती यात्रा असते. या परंपरेनुसार आज (20 फेब्रुवारी 2023) जेजुरीच्या खंडोबाच्या गडावर सोमवती यात्रा आहे. या यात्रेत भविक मोठ्या संख्येने आणि भक्तीभावाने सहभागी झाले आहेत.
जेजुरी गडावर वर्षभरात अनेकदा यात्रा उत्सव असतात. पण सोमवती यात्रेला विशेष महत्त्व आहे. जेजुरीचा खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. यामुळे जेजुरीच्या सोमवती यात्रेला जास्त महत्त्व आहे. जर सोमवारी अमावस्या आली तर जेजुरीच्या खंडोबाच्या गडावर सोमवती यात्रेचे आयोजन केले जाते. या परंपरेनुसार आज (20 फेब्रुवारी 2023) जेजुरीच्या खंडोबाच्या गडावर सोमवती यात्रा आहे.
सोमवती यात्रेच्यावेळी खंडोबाच्या उत्सव मूर्तीला कऱ्हा नदीत स्नान घातले जाते. नंतर गडावर नेऊन मूर्तीची विधीवत पूजा केली जाते. या सोहळ्यात आणि नंतर गडावरील दर्शन सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. खंडेरायाच्या दर्शनाला लाखो भाविक येतात.
आज (20 फेब्रुवारी 2023) सकाळपासूनच गडावर दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. नियोजनानुसार सकाळी 11 वाजता खंडोबाची मूर्ती कऱ्हा नदीकडे मार्गस्थ होणार आहे. नगर प्रदक्षिणा करत पालखी नदीच्या दिशेने जाणार आहे. खांदेकरी आणि मानकरी खांद्यावर पालखी घेऊन जातील. पालखी सोहळ्यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतील. यावेळी भंडारा मोठ्या प्रमाणात उधळला जाईल. यळकोट यळकोट जय मल्हार या घोषणांनी गड दुमदुमून जाईल.
Preserving History Of Forts : गड-किल्ल्यांचा इतिहास जपू : मुख्यमंत्री
MSRTC : एसटी कर्मचाऱ्यांना शिंदे सरकारची मोठी भेट, 2 महिन्यांचा पगार होणार
भंडारा अर्थात हळद मोठ्या प्रमाणात उधळल्याने दुरून जेजुरीच्या खंडोबाचा गड पिवळा दिसतो. उन्हात दुरून गड सोन्यासारखा चमकतो. याच कारणामुळे जेजुरी गडाला सोन्याची जेजुरी असेही म्हणतात.