साडी गजरा टिकली अशा मराठमोळ्या पेहरावात सुधा मूर्तींनी घेतली संभाजी भिडेंची भेट 

sudha murthy meet sambhaji bhide and took blessings from him : प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांनी साडी गजरा टिकली अशा मराठमोळ्या पेहरावात संभाजी भिडे यांची भेट घेतली.

sudha murthy meet sambhaji bhide and took blessings from him
सुधा मूर्तींनी घेतली संभाजी भिडेंची भेट  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • सुधा मूर्तींनी घेतली संभाजी भिडेंची भेट
  • साडी गजरा टिकली अशा मराठमोळ्या पेहरावात सुधा मूर्तींनी घेतली संभाजी भिडेंची भेट
  • सुधा मूर्ती संभाजी भिडे यांच्या पाया पडल्या

sudha murthy meet sambhaji bhide and took blessings from him : प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांनी साडी गजरा टिकली अशा मराठमोळ्या पेहरावात संभाजी भिडे यांची भेट घेतली. ही भेट सांगली जिल्ह्यातील एका कार्यक्रमात झाली. सुधा मूर्ती आणि संभाजी भिडे या दोघांनी पाच मिनिटे चर्चा केली. यावेळी सुधा मूर्ती संभाजी भिडे यांच्या पाया पडल्या. संभाजी भिडे यांनी सुधा मूर्ती यांना आशीर्वाद दिला.

सुधा मूर्ती आणि संभाजी भिडे यांच्या सांगली जिल्ह्यातील भेटीची भरपूर चर्चा होत आहे. या चर्चेचे कारण अलिकडेच घडलेल्या एका प्रसंगात दडले आहे. मुंबईत एका महिला पत्रकाराला 'आधी टिकली लाव मगच तुझ्याशी बोलतो' असे संभाजी भिडे म्हणाले होते. संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यावर उलटसुलट प्रतिक्रिया आल्या. या प्रतिक्रियांवर संभाजी भिडे यांनी अद्याप जाहीरपणे मतप्रदर्शन केलेले नाही. या अशा वातावरणात सुधा मूर्ती आणि संभाजी भिडे यांची सोमवार 7 नोव्हेंबर 2022 रोजी सांगली जिल्ह्यात भेट झाली. या भेटीचा व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहे. 

संभाजी भिडे यांची भेट घेताना सुधा मूर्ती मराठमोळ्या पेहरावात होत्या. त्यांनी साडी नेसली होती. नाकात नथ होते. केसात गजरा माळला होता. 

सुधा मूर्ती यांनी आधी कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथे त्यांच्या जुन्या घराला भेट दिली. तसेच सुधा मूर्ती यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेतले. सांगली जिल्ह्यातील एका कार्यक्रमालाही सुधा मूर्ती उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्यावेळी सुधा मूर्ती आणि संभाजी भिडे यांची भेट झाली. 

19 उप जिल्हाधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी पदोन्नती 

Dharmveer Sequel  : दिघेंच्या मृत्यूचे रहस्य उलगडणार? 2024 ला येणार धर्मवीरचा पार्ट -2

कोण आहेत सुधा मूर्ती ?

सुधा कुळकर्णी-मूर्ती सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका आहेत. प्रामुख्याने ग्रामीण भागाच्या विकासाकरिता सुधा मूर्ती काम करत आहेत. सुधा मूर्ती यांनी भारती विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग कॉलेजमधून बी.ई. इलेक्ट्रिकलची पदवी सुवर्णपदकासह मिळवली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथून त्या संगणक शास्त्रात एम.ई. झाल्या आहेत. त्यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये एम. टेक. पण केले आहे. 

टाटा समुहाच्या टेल्को कंपनीतील पहिल्या महिला अभियंता, बंगलोर विद्यापीठाच्या गेस्ट लेक्चरर, इन्फोसिस कंपनीच्या सीएसआर (Corporate Social Responsibility - CSR) निधीचा वापर योग्य प्रकारे व्हावा यासाठी स्थापन केलेल्या ट्रस्टच्या त्या ट्रस्टी आहेत. 

कोण आहेत संभाजी भिडे ?

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेचे संस्थापक आणि प्रमुख आहेत संभाजी भिडे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी