Income Tax Raids: आयकर खात्याच्या रडारवर राज्यातील साखर कारखानदार अन् भागीदार ; कोल्हापूर, सोलापुरात छापे

सोलापूर (Solapur,), पंढरपूरसह (Pandharpur) अन्य ठिकाणी साखर कारखान्यांवर (sugar factories) आयकर खात्याची (Income Tax Department) छापेमारी (Raid) सुरू असतानाच कोल्हापूरमध्येही (Kolhapur) धाडी पडल्या आहेत. कोल्हापुरातील कारखानदारांच्या संबंधितांवर व भागीदारांच्यांवर ही छापेमारी झाली असल्याची माहिती हाती आली आहे.

Sugar mills and partners  on the income tax department's radar
IT च्या छापेमारी सत्रामुळे साखर कारखानदारांची 'साखर' वाढणार  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • कोल्हापुरातील कारखानदारांच्या संबंधितांवर व भागीदारांच्यांवर ही छापेमारी झाली
  • शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाडा येथे आयकर विभागाची छापेमारी
  • रात्री उशिरापर्यंत पथकाकडून कागदपत्राची तपासणी व चौकशी

कोल्हापूर: सोलापूर (Solapur,), पंढरपूरसह (Pandharpur) अन्य ठिकाणी साखर कारखान्यांवर (sugar factories) आयकर खात्याची (Income Tax Department) छापेमारी (Raid) सुरू असतानाच कोल्हापूरमध्येही (Kolhapur) धाडी पडल्या आहेत. कोल्हापुरातील कारखानदारांच्या संबंधितांवर व भागीदारांच्यांवर ही छापेमारी झाली असल्याची माहिती हाती आली आहे. (Sugar mills and partners in the state on the income tax department's radar)

कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील (Shirol taluka) अर्जुनवाडा येथे आयकर विभागाची छापेमारी करण्यात आली आहे. ज्यांच्या घरावर छापा पडला ते शिरोळ तालुका पंचायत समितीचे माजी सभापतींचे पती आहेत. हा छापा गुरुवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास पडला त्यानंतर दुपारपर्यंत घरातील सर्व कागदपत्रांची झाडाझडती केली त्यानंतर त्यांच्या जयसिंगपूर येथील आलिशान बंगल्याची पाहणी हे आयकर विभागातर्फे करण्यात आली रात्री उशिरापर्यंत पथकाकडून कागदपत्राची तपासणी व चौकशी सुरू होती याबद्दल काय समोर आले आहे हे अद्यापही करू शकले नाही. परंतु या छापेमारीचे थेट कनेक्शन हे सोलापूर आणि पंढरपूरसह अन्य ठिकाणी पडलेल्या साखर कारखान्यावरील छापेमारीशी असल्याचे समोर येत आहे. 

Read Also : कुटुंबातील पाच जणांचा खून केल्यानंतर युवकाची आत्महत्या

शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाडा येथील तालुका पंचायत समितीच्या माजी सभापतींच्या घरावर ही छापेमारी करण्यात आली आहे. आयकर विभागाचे पथक गुरुवारी सकाळी पावणेआठ वाजताच छाप्यासाठी दाखल झाले. त्यांनी दुपारपर्यंत घरातील सर्व कागदपत्रांची झाडाझडती केली. त्यानंतर जयसिंगपूर येथील त्यांच्या आलिशान बंगल्यांची पाहणी केली. नंतर सांगलीतील त्यांच्या प्लॉटचीही पाहणी केली. 

Read Also : तुमचा IQ असेल ग्रेट तर डोकं न खाजवता शोधा तिसरा प्राणी

संबंधित व्यक्तीचा गौण खनिजाचा व्यवसाय असून सोबतच वाळू उपसा बोटी तयार करण्याचा कारखाना आहे. उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील आणखी काही साखर कारखान्यात भागीदारी आहे. या कारखान्यांवर छापेमारी झाल्याने कारखान्यात भागीदारी असलेल्याच्या निवासस्थानांवरही छापा टाकल्याने परिसरात खळबळ उडाली. पथकाने घरासह परिसराची आणि कागदपत्रांची झाडाझडती घेतली दरम्यान यावेळी येथे मोठा पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी