शेतकऱ्याच्या खात्यात पैसे कधी जमा करणार त्याची तारीख सांगा, कोल्हापूरात राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा मोर्चा

जाचक अटी रद्द करून राज्यातील प्रामाणिकपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कोल्हापूरात मोर्चा काढण्यात आला.

Tell us the date when the money will be deposited in the farmer's account, the farmers' march led by Raju Shetty in Kolhapur
शेतकऱ्याच्या खात्यात पैसे कधी जमा करणार त्याची तारीख सांगा, कोल्हापूरात राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा मोर्चा ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरात शेतकऱ्यांचा मोर्चा
  • नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान मिळावे
  • भरपावसात मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान मिळावे म्हणून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरातील दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. कोल्हापूरात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असताना या मोर्चाला कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकरी हजर झाले होते. (Tell us the date when the money will be deposited in the farmer's account, the farmers' march led by Raju Shetty in Kolhapur)

अधिक वाचा : Mumbai Crime: 10 वर्षांनी लहान प्रियकरासोबत हॉटेलमध्ये गेली, सकाळ होताच बेडवर आढळला मृतदेह

महाविकास आघाडी सरकारने नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचे अनुदान देण्याची घोषणा केली होती मात्र हे सरकार पडल्यानंतर नवीन आलेल्या शिंदे सरकारने हा निर्णय रद्द केला आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर १ जुलै पासून पैसे जमा होणार होते, त्याला स्थगिती का दिली?, असा सवाल माजी खा. राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला.

अधिक वाचा : Akola Accident : अकोल्यात नदीच्या पुलाचे कठडे तोडून गाडी कोसळली नदीत, क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यास यश

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना प्रोत्साहन मदत करण्याच्या निर्णयासाठी अर्थ संकल्पात 10 हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती मात्र हा निर्णय रद्द झाल्यामुळे हा निधी हे सरकार दुसरीकडे वळणार असल्याचा मोठा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी या धडक मोर्चावेळी केला.  ट्विट करण्यापेक्षा पैसे कधी जमा करणार त्याची तारीख सांगा, असं आव्हानच राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.

अधिक वाचा : गुरुपौर्णिमेच्या दिवशी CM एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे ५० हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नाही याची दखल घेऊन लवकरच अशा पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार नाही याबाबतचा शासन निर्णय त्वरीत काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. 

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महोदय, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर १ जुलैपासून पैसे जमा होणार होते, त्याला आपण स्थगिती का दिली? तुम्ही आता केलंय असचं ट्विट आधीच्या मुख्यमंत्र्यांनी पुरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी केले होते, पण अखेर त्यांचा भ्रमनिरासच झाला".

"त्यावेळी आमची फसवणूक झाली आहे. या निर्णयाला शेतक-यांचा विश्वास बसण्यासाठी ट्वीट करण्यापेक्षा शासन निर्णय करा व कधीपासून पैसे जमा करणार त्याची तारीखही जाहीर करा".

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी