आंदोलनाच्या आयोजित बैठकीत संभाजीराजेंच्या समोरच कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ, पहा व्हिडिओ

The agitation of Maratha community will take place in Kolhapur tomorrow : छत्रपती संभाजी राजे यांच्या समोरचं आंदोलकांनी गोंधळ घातल्याची घटना घडल्याने मोठा गोंधळ उडाला असल्याचे पहायला मिळाले आहे.

The agitation of Maratha community will take place in Kolhapur tomorrow
संभाजीराजेंच्या समोरच बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शाहू महाराजांच्या समाधीस्थळी मूक आंदोलन करण्यात येणार आहे
  • संभाजीराजे यांनी उभं राहून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन
  • मराठा आरक्षण देणे ही ठाकरे सरकारची जबाबदारी आहे, जर त्यांनी निर्णय घेतला नाहीतर उद्रेक होईल – उदयनराजे भोसले

कोल्हापूर : छत्रपती संभाजी राजे यांच्या समोरचं आंदोलकांनी गोंधळ घातल्याची घटना घडल्याने मोठा गोंधळ उडाला असल्याचे पहायला मिळाले आहे. मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे यांनी कंबर कसली असल्याचे पहायला मिळालं आहे. मराठा आरक्षणासाठी (maratha reservation) खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी कोल्हापूरमध्ये (Kolhapur) आंदोलनाची हाक दिली असून, आंदोलनाच्या आदल्यादिवशी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये गोंधळ पाहण्यास मिळाला आहे. दरम्यान, बैठकीत खासदार संभाजीराजे यांच्यासमोरच आंदोलकांनी गोंधळ घातल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

शाहू महाराजांच्या समाधीस्थळी मूक आंदोलन करण्यात येणार आहे

१६ जून रोजी कोल्हापूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन शाहू महाराजांच्या समाधीस्थळी करण्यात येणार असून, सदर आंदोलन हे मूक आंदोलन असणार आहे. खासदार संभाजीराजे यांनी मराठा आंदोलनासाठी कंबर कसली असल्याचे पहायला मिळाले आहे. दरम्यान, त्यांच्या उपस्थितीतचं हे आंदोलन होणार आहे. त्यानिमित्ताने आज आंदोलनाच्या तयारीसाठी कोल्हापूरमधील मराठा संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक नर्सरी बागेत आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीत एकच गोंधळ उडाला.

संभाजीराजे यांनी उभं राहून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन

संभाजीराजे यांच्या समोरच कार्यकर्ते गोंधळ घालत असल्यामुळे संभाजीराजे यांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागला असून, संभाजीराजे यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. पण, बराच वेळ हा गोंधळ सुरूच असल्यामुळे काही काळ तणावाची परस्थिती निर्माण झाली होती.

 मराठा आरक्षण देणे ही ठाकरे सरकारची जबाबदारी आहे, जर त्यांनी निर्णय घेतला नाहीतर उद्रेक होईल – उदयनराजे भोसले 

मराठा आरक्षण देणे ही ठाकरे सरकारची जबाबदारी आहे, जर त्यांनी निर्णय घेतला नाहीतर उद्रेक होईल, असा इशाराही उदयनराजे यांनी दिला आहे. संभाजीराजे यांनी जे विचार मांडले त्याचाशी मी सहमत आहे. 'संभाजीराजे यांच्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. असं देखील उदयनराजे यांनी म्हटलं आहे.

 

उदयनराजे यांनी १६ तारखेला कोल्हापूरमधील आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे

दरम्यान, संभाजीराजे यांनी सोमवारी पुण्यात उदयनराजे (Udayanraje Bhosale) यांची भेट घेतली होती.  या भेटीनंतर 'आम्ही दोघे एकाच घराण्यातले आहोत. त्यामुळे इथं दोन घराण्याचा संबंध येत नाही. त्यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा विषय आहे. पण आमचा मार्ग हा एकच आहे' असं म्हटलं होत. त्याचबरोबर उदयनराजे यांनी १६ तारखेला कोल्हापूरमधील आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी