उद्याच्या आंदोलनात सहभागी होणाऱ्यांसाठी 'अशी' असेल नियमावली, ड्रेसकोडही ठरला

The agitation of Maratha community will take place in Kolhapur tomorrow: खासदार संभाजी महाराज यांनी मराठा आरक्षणासाठी कंबर कसली असून, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संभाजीराजे यांनी एल्गार पुकारला आहे.

The agitation of Maratha community will take place in Kolhapur tomorrow
उद्याच्या आंदोलनात सहभागी होणाऱ्यांसाठी 'अशी' असेल नियमावली  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांना कडक आचारसंहिता लागू केली आहे.
  • आंदोलनात सहभागी होण्यासाठी सर्वांनी काळ्या रंगाचा ड्रेस घालून यावा
  • प्रकाश आंबेडकरही आंदोलनात राहणार उपस्थित

कोल्हापूर: १६ जून रोजी कोल्हापूर येथे मराठा समाजाचे आंदोलन होणार आहे. सदर आंदोलन हे मुक स्वरूपातील असणार आहे. 'आम्ही बोललो, समाज बोलला आता लोकप्रतिनिधी तुम्ही बोला आणि जबाबदारी स्वीकारा' असं म्हणत खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje) यांच्या नेतृत्वाखाली १६ जून रोजी मराठा क्रांती मूक आंदोलन (Maratha kranti andolan Kolhapur) होणार आहे. दरम्यान, कोल्हापुरात होणाऱ्या या आंदोलनातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांना नियमावली देण्यात आली आहे. 

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांना कडक आचारसंहिता लागू केली आहे.

खासदार संभाजी महाराज यांनी मराठा आरक्षणासाठी कंबर कसली असून, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संभाजीराजे यांनी एल्गार पुकारला आहे. कोल्हापूरमध्ये पहिला मूक आंदोलन निघणार आहे. खुद्द संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलनं होणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांना कडक आचारसंहिता लागू केली आहे. मला काही होणार नाही, यापेक्षा माझ्यामुळे काही होणार नाही,याची दक्षता घेणे अतिआवश्यक आहे. असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

आंदोलनात सहभागी होण्यासाठी सर्वांनी काळ्या रंगाचा ड्रेस घालून यावं अशी सूचना करण्यात आली आहे.

अशी आहे नियामवली

१) सर्वांची वेशभूषा काळ्या रंगाची असावी

२) प्रत्येकांनी दंडावरती काळी फीत बांधून येणे

३) प्रत्येकांनी काळा मास्क वापरावा

४) शक्यतो सोबत येताना सॅनिटायझर आणावे.

५) इतरांना त्रास होईल, असे कोणतेही वर्तन करू नये.

६) कोरोनाच्या नियमाचे पालन करावे

प्रकाश आंबेडकरही आंदोलनात राहणार उपस्थित

येत्या १६ जून रोजी खासदार संभाजीराजे यांच्या यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी यांनी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. १६ जून रोजी कोल्हापूरमध्ये पहिला मूक आंदोलन करण्यात येणार असून, या आंदोलनाला आता वंचित बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी देखील पाठींबा देत, ते सहभागी देखील होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर हे संभाजी राजे यांच्या नेतृत्वात होत असलेल्या आंदोलनात सहभागी होत असल्याने ही राज्याच्या राजकारणातली मोठी घडामोड असल्याचे बोलले जात आहे. 

प्रकाश आंबेडकर यांच्या सहभागामुळे राज्यातील राजकारणाला नवी दिशा मिळण्याचे चिन्ह

खुद्द प्रकाश आंबेडकर यांच्या सहभागामुळे राज्यातील राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहेत. विशेष म्हणजे, संभाजीराजे यांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. त्यातच प्रकाश आंबेडकर हे उद्याच्या मोर्चात सहभागी होत असल्याने येत्या काळात नेमक्या काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी