मुली शाळेत जात नव्हत्या, पालकांनी जाणून घेतले कारण तर सरकली पायाखालची जमीन

The teacher was doing obscenity with the girl : मुलींसोबत गैरवर्तन करणाऱ्या नराधम शिक्षकाचे नाव नामदेव पवार असं आहे. पिडीत मुलींनी शिक्षक नामदेव पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. काही दिवसांपासून मुली शाळेत जात नव्हत्या. मुली शाळेत का जात नाही याची चौकशी केली असता हे प्रकरण समोर आले आहे.

 The teacher was doing obscenity with the girl
मुली शाळेत जात नव्हत्या कारण समोर आल्याबर बसला धक्का   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शिक्षकाने शाळेतील मुलींशी असभ्य लैंगिक वर्तन केल्याचा संतापजनक प्रकार आला समोर
  • शिक्षकाच्या भीतीने मुलीनी शाळेत जाणे केले होते बंद
  • संभाजी ब्रिगेडकडून संबंधित शाळेच्या मुख्यध्यापकांना जाब विचारण्यात आला

कोल्हापूर :  शिक्षकाने शाळेतील मुलींशी असभ्य लैंगिक वर्तन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षकानेच मुलींशी असभ्य वर्तन केल्याने जिल्ह्यात पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील पोर्ले इथल्या शाळेत ही धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, पिडीत मुलींनी शिक्षकाचा इतका घसका घेतला की मुलीनी शाळेतच जाणे बंद केले होते. आपल्या मुली नेमकं शाळेत का जात नाहीत याची चौकशी पालकांनी केली असता या चौकशीत हा संतापजनक प्रकार उघड झाला आहे.

अधिक वाचा ; Pune railway: आज ड्युटी संपवून वीकेंडला फिरायला जाताय?

संभाजी ब्रिगेडकडून संबंधित शाळेच्या मुख्यध्यापकांना जाब विचारण्यात आला

मुलींसोबत गैरवर्तन करणाऱ्या नराधम शिक्षकाचे नाव नामदेव पवार असं आहे. पिडीत मुलींनी शिक्षक नामदेव पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. काही दिवसांपासून मुली शाळेत जात नव्हत्या. मुली शाळेत का जात नाही याची चौकशी केली असता हे प्रकरण समोर आले आहे. पालकांना आपल्या मुलींसोबत असं वर्तन झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कोल्हापूर जिल्ह्यातील पोर्लेमध्ये असलेल्या एका शाळेत हा प्रकार घडला आहे. पालकांनी हा प्रकार संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना सांगितला असता संभाजी ब्रिगेडकडून संबंधित शाळेच्या मुख्यध्यापकांना जाब विचारण्यात आला आहे. तसेच संबंधित शिक्षकांना बडतर्फ करण्याची मागणी देखील संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

अधिक वाचा ; पगार पुरतच नाही...मग कशी आणि किती बचत करावी? मोठ्या टिप्स 

शिक्षणमंत्रीच पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातून हे धक्कादायक कृत्य

दरम्यान, विशेष म्हणजे दीपक केसरकर हे राज्याचे शिक्षण मंत्री आहेत. तसेच ते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत. शिक्षणमंत्रीच पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात अशी धक्कादायक घटना समोर आल्याने जनतेतून विविध चर्चा समोर येत आहेत. तर या प्रकरणात मुलीनी ज्या शिक्षकावर आरोप केले आहेत, त्या शिक्षकांना बडतर्फ करा अशी मागणी आता करण्यात येत आहे. दरम्यान, जर या शिक्षकांना बडतर्फ करण्यात आले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

अधिक वाचा ; Pune railway: आज ड्युटी संपवून वीकेंडला फिरायला जाताय?

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी