खतरनाक व्हिडिओ, कोल्हापूर जिल्ह्यातील ५९ बंधारे पाण्याखाली, पंचगंगा पात्र सोडून बाहेर 

कोल्हापूर
Updated Jun 18, 2021 | 13:52 IST

कोल्हापूर (kolhapur) जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीचे पाण्याला उधाण आले आहे.  कसबा बावडा (kasaba bavda)येथील पंचगंगा नदीचे पाणी पातळी 33 फुटापर्यंत वाढली आहे.

थोडं पण कामाचं

 • कोल्हापूर (kolhapur) जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीचे पाण्याला उधाण आले आहे.
 •  कसबा बावडा (kasaba bavda)येथील पंचगंगा नदीचे पाणी पातळी 33 फुटापर्यंत वाढली आहे.
 • कोल्हापूर जिल्ह्यात काल सकाळी आठपर्यंत सरासरी १०४.३ मिलीमीटर पाऊस झाला

Maharashtra rains ।  कोल्हापूर :  कोल्हापूर (kolhapur) जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीचे पाण्याला उधाण आले आहे.  कसबा बावडा (kasaba bavda)येथील पंचगंगा नदीचे पाणी पातळी 33 फुटापर्यंत वाढली आहे. काल पंचगंगेची पाणी पातळी 32.1 फूट इतकी होती, तर विसर्ग 33 हजार 101 क्युसेक होता. आत्तापर्यंत जिल्ह्यातील 58 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्रीदत्त मंदिरात चालू सालचा पहिला दक्षिणद्वार सोहळा शुक्रवार पहाटे 2 वा संपन्न झाला.

जिल्ह्यात काल सकाळी आठपर्यंत सरासरी १०४.३ मिलीमीटर पाऊस झाला असून, सर्वच तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे पाच जिल्हा मार्गांसह एक राज्यमार्ग वाहतुकीस बंद झाला. तेथे पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. आजरा वगळता इतर कोठेही पावसामुळे हानी झालेली नाही. पंचगंगेची पातळी बुधवारी दुपारी चारपर्यंत १३ फुटांवर होती. गुरुवारी पहाटे चार वाजता ती २१, तर दुपारी चार वाजता हीच पातळी तब्बल ३०.३ फुटांपर्यंत गेली. साधारण २४ तासांत पाणीपातळी १७ फुटांनी वाढली आहे. पात्राबाहेर पडलेले पंचगंगेचे पाणी पाहण्यास गर्दी झाली होती. तेथे पोलिसांनी कारवाई करून अनेकांना दंड सुनावला. अनेकांनी सेल्फी काढून सोशल मीडियावर टाकले. शहरातील सखल भागात तर परीख पुलाखाली पाणी साचल्यामुळे वाहनधारकांची कसरत झाली.

दरम्यान, काल रात्रीच राजाराम बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे तो मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला. जिल्ह्यात ऑरेज अलर्ट असून यापूर्वीच हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला होता. दरम्यान, राधानगरी धरणात २७ टक्के, तुळशी धरणात ५०, तर उर्वरित धरणांत ३०-३५ टक्के पाणी साठा आहे.

प्रकल्पातील विसर्ग (क्युसेकमध्ये) गुरुवारी दुपारी चारची स्थिती

प्रकल्प - एकूण विसर्ग

 1. राधानगरी - ११००
 2. तुळशी - ५००
 3. वारणा - ५५०
 4. दूधगंगा - ११००
 5. कासारी -२५०
 6. कडवी -१८०
 7. कुंभी -३००
 8. पाटगाव -२२५
 9.  

पाण्याखाली गेलेले बंधारे असे

 1. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, शिरोळ व तेरवाड.
 2. भोगावती नदी - राशिवडे व हळदी
 3. तुळशी नदी - घुंगूरवाडी, बाचणी, आरे व बीड
 4. दूधगंगा नदी - सुळकूड व बाचणी
 5. कासारी नदी - यवलूज
 6. कुंभी नदी - सांगशी, मांडूकली, शेणवडे व कळे
 7. वारणा नदी - चिंचोली व माणगाव
 8. घटप्रभा नदी - कानडेसावर्डे, पिळणी, बिजूरभोगोली, अडकूर, कानडेवाडी व तारेवाडी
 9. हिरण्यकेशी नदी - साळगाव, ऐनापूर, निलजी, गिजवणे, खाणदळ, जरळी व दाबीळ
 10. वेदगंगा नदी - निळपण, वाघापूर, गारगोटी, म्हसवे, कुरणी, बस्तवडे, सुरूपली व चिखली

जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा (दलघमीमध्ये) - तुळशी ४८.८४, वारणा ४२८.२, दूधगंगा २३२.४५, कासारी २५.७४ , कडवी २७.३९, कुंभी ३३.०६, पाटगाव ४७.३४, चिकोत्रा १९.२७, चित्री २३.९९, जंगमहट्टी ९.९५, घटप्रभा ४४.१७, जांबरे १९.०८, आंबेआहोळ २.६१, कोदे (ल.पा) २.५०

पाऊस झाला असा...

जिल्ह्यात गुरुवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा :

हातकणंगले- ८९.५, शिरोळ- ७३.२, पन्हाळा- ११५.१ , शाहूवाडी- १२७.३, राधानगरी- ११९.२, गगनबावडा-१८२.७, करवीर- ९७, कागल- ११०.१, गडहिंग्लज- १००.७, भुदरगड- ९७, आजरा- ८५.७ , चंदगड- ११३.१.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी