Chandrakant Patil ।  सरकारच्या हातालाच नाही, तर मेंदूला पण लकवा -  चंद्रकांत पाटील 

कोल्हापूर
Updated Jan 04, 2022 | 20:51 IST

 या सरकारची कोणती बुद्धी चालत नाही, कोणतेही निर्णय या सरकार कडून घेतले जात नाहीत, या सरकार मध्ये कोणताही ताळमेळ नाही, त्यामुळे या सरकारच्या हातालाच नव्हे तर संपूर्ण बुद्धीला लकवा मारला आहे,

थोडं पण कामाचं
  • या सरकारची कोणती बुद्धी चालत नाही
  • कोणतेही निर्णय या सरकार कडून घेतले जात नाहीत,
  • भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली घणाघाती टीका

सांगली :  या सरकारची कोणती बुद्धी चालत नाही, कोणतेही निर्णय या सरकार कडून घेतले जात नाहीत, या सरकार मध्ये कोणताही ताळमेळ नाही, त्यामुळे या सरकारच्या हातालाच नव्हे तर संपूर्ण बुद्धीला लकवा मारला आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केली आहे. 

आधीच्या सरकारला शरद पवार म्हणत होते की, तुमच्या हाताला लकवा मारला आहे. पण मी म्हणतोय की, आता यांच्या  हातालाच नाही, तर मेंदूला पण लकवा मारला आहे. यांची बुद्धीच चालत नाही. कोणतेच निर्णय घेत नाहीत, यांनी 5 AS  अधिकारी घालवले यांना अधिकाऱ्यांना आयुष्यात चांगले काम करता आले असते, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केली टीका.

प्रवीण दरेकरांना सरकारनं अपात्र केलं आहे. हे सरकार सत्तेचा दुरुपयोग करून काहीही करू शकते , आम्ही या प्रकरणी न्यायालयात जाऊ असे चंद्रकांत पाटील म्हटले आहे. त्याठिकाणी या सरकारला थप्पड खाण्याची खूप सवय आहे, असा टोला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी लगावला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी