घोडयासाठी सरकारी कार्यालयात जागा मागणाऱ्याने मागितली माफी

नांदेड जिल्ह्यात सरकारी सेवेतील एका व्यक्तीने वरिष्ठांकडे एक अर्ज केला. या अर्जाची प्रत व्हायरल होत आहे.

apology from officer seeking permission to stand horse in the collectorate premises
घोडयासाठी सरकारी कार्यालयात जागा मागणाऱ्याने मागितली माफी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • घोडयासाठी सरकारी कार्यालयात जागा मागणाऱ्याने मागितली माफी
  • सरकारच्या वैद्यकीय विभागाने प्रतूकल मत दिल्यानंतर अर्जदाराने मागितली माफी
  • अर्जदाराने मागे घेतला अर्ज पण अर्जाचे पत्र झाले व्हायरल

नांदेड: सरकारी कारभार म्हणजे नियमांच्या चौकटीत राहून होणारे काम. असंख्य नोंदी, फायली, शेरे, आकडेवारी, अहवाल असे रुक्ष भासणारे काम. पण या सरकारी कारभारात काही वेळा अनपेक्षित अशा घटना घडतात. या घटना सहज हसवतात. असाच एक गंमतीशीर प्रसंग महाराष्ट्रात नुकताच घडला. राज्यातील नांदेड जिल्ह्यात सरकारी सेवेतील एका व्यक्तीने वरिष्ठांकडे एक अर्ज केला. या अर्जाची प्रत व्हायरल होत आहे. (apology from officer seeking permission to stand horse in the collectorate premises)

नांडेड जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार हमी योजना शाखेत सहाय्यक लेखाधिकारी पदावर सतिश पंजाबराव देशमुख नावाची व्यक्ती कार्यरत आहे. या व्यक्तीने जिल्हाधिकाऱ्यांकडे एक अर्ज केला.... पाठदुखीमुळे दुचाकीवरुन प्रवास करण्यास त्रास होत आहे. त्यामुळे घोडा खरेदी करण्याचे ठरविले आहे. घोड्यावर बसून कार्यालयात येणार आहे. घोडा आणल्यास त्याला बांधण्यासाठी कार्यालयीन परिसरात परवानगी द्यावी... अशा स्वरुपाचा अर्ज देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. 

सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. अशा वेळी चालत अथवा साकयलवरुन प्रवास करण्याचा विचार काही जण करत आहेत. या अशा वातावरणात एका व्यक्तीने महागाईमुळे त्रासून नाही तर पाठदुखीमुळे त्रस्त असल्याने घोडा खरेदी करणार असल्याचे जाहीर केले. यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. घोडा दुडक्या चालीने चालतो अथवा धावतो. घोड्यावर बसून पाठदुखीचा त्रास होणार नाही हा शोध सरकारी सेवेतील व्यक्तीने कसा आणि कधी लावला, अशा स्वरुपाचा प्रश्न अनेकांनी व्हायरल पत्र बघून सोशल मीडियावर उपस्थित केला आहे. 

घोड्याच्या दैनंदिन देखभालीसाठीही खर्च करावा लागतो. एकवेळ दुचाकी बंद ठेवून चालत आलो तर पैसे वाचतील पण घोड्याचा वापर केला अथवा नाही केला तरी त्याच्यावर दररोज खर्च करावा लागतो. यामुळे घोड्यावरचा खर्चसहाय्यक लेखाधिकारी पदावरील व्यक्तीला कसा परवडणार, असाही प्रश्न सोशल मीडियावर काही चौकस बुद्धीच्या मंडळींनी उपस्थित केला आहे.

विशेष म्हणजे नियमाने चालणाऱ्या सरकारी कारभारात सहाय्यक लेखाधिकाऱ्याची पत्राची गंभीर दखल घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी पत्राच्या वृत्ताला दुजोरा दिला. देशमुखांनी सादर केलेल्या पत्रावर वैद्यकीय अधिष्ठातांचा अभिप्राय मागववण्यात आला. अस्थिव्यंग विभागाने पाठीच्या कण्याच्या दुखण्यावर दुचाकीऐवजी घोड्यावर बसून कार्यालयात येणे, हा उपाय संयुक्तिक नसल्याचा अभिप्राय दिला. तो अधिष्ठातांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठवला.यानंतर या सतीश देशमुख यांनी त्यांची मागणी मागे घेत माफीनामा सादर केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. पण तोपर्यंत देशमुख यांचे घोड्यासाठी जागा मागणारे पत्र व्हायरल झाले. 

आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात (२०२१ या वर्षात) घोड्यावर बसून घर ते कार्यालय असा प्रवास करण्याचा विचार एखादी व्यक्ती करते, याविषयी अनेकांना आश्चर्य वाटत आहे. यामुळे सरकारी कार्यालयाच्या आवारात घोडा बांधण्यासाठी जागा मागणारा ३ मार्च २०२१चा अर्ज व्हायरल होत आहे. सरकारी यंत्रणेसाठी अर्जाचा विषय संपला तरी सोशल मीडियावर या अर्जाची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी