धनंजय मुंडे रस्त्यावर उभे राहून पंकजा मुंडेंचे करणार स्वागत पण....

लातूर
भरत जाधव
Updated Mar 26, 2023 | 17:19 IST

जिल्ह्यातील परळी मतदारसंघातील Parli (Constituency)धर्मापुरी या गावात जलजीवन मिशन (Jaljeevan Mission) कामाचे भूमिपूजनाच्या (Bhumi Puja) कार्यक्रमात धनंजय मुंडे यांना विकासकामांच्या श्रेय घेण्यावरुन चांगलेचे सुनावले.  तुमची प्रतिष्ठा असेल त्यांनी मी मंजूर केलेल्या एमआयडीसीवर (MIDC) एक उद्योग आणून दाखवावा.

Dhananjay Munde will stand on the street and welcome Pankaja Munde but....
धनंजय मुंडे पंकजाताईंचे करतील स्वागत, पण...   |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
  • 10 वर्षामध्ये तुम्ही या भागाचे लोक प्रतिनिधी होतात त्यावेळेस या भागाचा विकास जो तुम्ही खुंटवला त्याचं सुद्धा श्रेय घ्यावं लागेल
  • आज ना तुम्ही केंद्रात आहात ना राज्यात आहात.
  • प्रत्येक धर्मात पाणी पाजणं हे पुण्याचे काम समजलं जातं, ते पुण्याचं काम मी पालकमंत्री म्हणून जलजीवन चा आराखडा तयार करताना केले.

सुकेशनी नाईकवाडे(बीड): जिल्ह्यातील परळी मतदारसंघातील Parli (Constituency)धर्मापुरी या गावात जलजीवन मिशन (Jaljeevan Mission) कामाचे भूमिपूजनाच्या (Bhumi Puja) कार्यक्रमात धनंजय मुंडे यांना विकासकामांच्या श्रेय घेण्यावरुन चांगलेचे सुनावले.  तुमची प्रतिष्ठा असेल त्यांनी मी मंजूर केलेल्या एमआयडीसीवर (MIDC) एक उद्योग आणून दाखवावा. जर ते झालं तर आपण रस्त्यावर उभे राहून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे स्वागत करेन असा टोला धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी लगावाला.   (Dhananjay Munde will stand on the street and welcome Pankaja Munde but....)

अधिक वाचा  : वजन वाढण्यासाठी ऑफिसमधल्या या सवयी ठरू शकतात कारणीभूत
या कार्यक्रमास माजी आमदार संजय दैड,जिल्हाध्यक्ष ऍड राजेश्वर चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी सिरसाट, तालुकाध्यक्ष लक्ष्मण पैळ, ऍड गोविंद फड सह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व नागरिक मोठय संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, मागच्या काळात काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्यात आपलीही झाली काही ग्रामपंचायती आमच्या आल्या तर काही विरोधात गेल्या.

त्यात जलजीवनाचे काम अनेक जणांनी केले. भाजपच्या नेत्या सांगत होत्या की, अर्धा पैसा हा केंद्राचा अन् अर्धा  पैसा हा राज्य सरकारचा आहे .पण आज ना तुम्ही केंद्रात आहात ना राज्यात आहात, तरी तुम्हाला वाटतंय की जलजीवनचे भूमिपूजन तुम्ही करावं, करा, आमचं काही म्हणणं नाही. 

अधिक वाचा  : अरर्रर सारा खतरनाक! 8 गोष्टींवर लगाम लावत घटवलं 45 किलो वजन

आमचा याला विरोध नाही या जल जीवनच श्रेय तुम्हाला घ्यायचे तर मग मागच्या 10 वर्षामध्ये तुम्ही या भागाचे लोक प्रतिनिधी होतात त्यावेळेस या भागाचा विकास जो तुम्ही खुंटवला त्याचं सुद्धा श्रेय घ्यावं लागेल नुसतं जल जीवनचं श्रेय घेऊन जमणार नाही. असा टोला धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचे नाव न घेता लगावला. 

ते पुढे बोलतांना म्हणाले की, जलजीवन मिशन ही योजना खरं ही महाविकास आघाडी सरकारने आणलेली आहे. राज्य सरकारने अर्धा पैसे देण्याची जबाबदारी सरकारने घेतली होती. ज्या वेळेस जलजीवनचा आराखडा तयारी  होत होती, तेव्हा या जिल्ह्यामध्ये त्या आराखड्याची तयारी पूर्ण करण्याची जबादारी पालकमंत्री म्हणून माझ्यावर होती, त्यामुळे मी या मतदारसंघातलं जलजीवन मधून कुठलाच गाव टाळलं नाही,

त्यावेळेस ग्रामपंचायतीतून एखादी ग्रामपंचायत आपल्या विरोधात जाईल. मग काय कस काय याचा विचार मी केला नाही माझ्या दृष्टीने एखाद्या गावाची ग्रामपंचायत भलेही कोणाची ही असो गावात जर प्यायला पाणी मिळत नसेल तर. पण प्रत्येक धर्मात पाणी पाजणं हे पुण्याचे काम समजलं जातं,  ते पुण्याचं काम मी पालकमंत्री म्हणून जलजीवन चा आराखडा तयार करताना केले. 

अधिक वाचा  : लवकर वेट लॉस करण्यासाठी रताळं आहे फायदेशीर

पण त्याच श्रेय घ्यायचंय माझ्या आणखी एका गोष्टीच श्रेय घ्या माझी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना हात जोडून विनंती आहे की, अतिशय कष्टातून आणि  संघर्षातून मी परळी वैधनाथच्या मायबाप जनतेला शिरसळ्यामध्ये एमआयडीसी उभी करणार म्हणून या ठिकाणी सांगितले होते, त्या एमआयडीसीचे भूसंपादन झाले आहे. माझी विनंती आहे तुमची जर एवढी मोठी प्रतिष्ठा आहे  तर आज राज्यात तुमची सत्ता आहे, केंद्रात तुमची सत्ता आहे. मी स्वतः रस्त्यावर उभा राहून तुमचे स्वागत करतो मी मंजूर केलेल्या एम आय डी सी वर एक उधोग आणून दाखवा, असं आव्हान धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचे  नाव न घेता दिले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी