खासदाराचा अपमान करणाऱ्यांना फडणवीसांनी दिला इशारा

लातूर
रोहन जुवेकर
Updated Apr 14, 2022 | 17:54 IST

Fadnavis warns those who insult MP : खासदाराचा अपमान करणाऱ्यांना रामदास आठवले आणि देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दात इशारा दिला. 

Fadnavis warns those who insult MP
खासदाराचा अपमान करणाऱ्यांना फडणवीसांनी दिला इशारा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • खासदाराचा अपमान करणाऱ्यांना फडणवीसांनी दिला इशारा
  • खासदाराचा अपमान करणाऱ्यांना रामदास आठवले आणि देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दात इशारा दिला
  • खासदाराला अपमानित करणाऱ्या अधिकाऱ्यांना आता संसदेच्या कटघरात उभं करून जरब बसवणार

Fadnavis warns those who insult MP : लातूर : महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आंबेडकरांचा सत्तर फुटी पुतळा उभारण्यात आला. याप्रसंगी बोलताना खासदार झाल्यापासून प्रशासनाकडून वाईट वागणूक मिळत असल्याचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी सांगितले. या मुद्यावर बोलताना खासदाराचा अपमान करणाऱ्यांना रामदास आठवले आणि देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दात इशारा दिला. 

सरकारी कार्यक्रमाचे शिष्टाचार असतात. या शिष्टाचारांचे पालन झाले पाहिजे. क्षुल्लक राजकारणासाठी खासदाराचा अपमान केला जात असेल आणि सरकारी कार्यक्रमाच्या शिष्टाचारांचे उल्लंघन होत असेल तर अधिकाऱ्यांना नियमांच्या चौकटीत राहून जागा दाखवून दिली जाईल; अशा स्वरुपाचे सूतोवाच रामदास आठवले आणि देवेंद्र फडणवीस यांनी केले. खासदाराला अपमानित करणाऱ्या अधिकाऱ्यांना आता संसदेच्या कटघरात उभं करून जरब बसवणार तोपर्यंत शांत बसणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी