Gopinath Munde Birth Anniversary गोपीनाथ मुंडे जयंती Marathi Wishes share on Facebook, Instagram

Gopinath Munde Birth Anniversary आज गोपीनाथ मुंडे यांच्या ७२व्या जयंती निमित्त मुंडे समर्थक एकमेकांना आपल्या लाडक्या नेत्याचे फोटो, व्हिडीओ, लोकप्रिय वाक्य पाठवून त्यांच्या कार्याचे स्मरण करत आहेत. आपणही जयंतीचे औचित्य साधून गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना अभिवादन करणारे मराठमोळे फोटो, ग्राफिक्स फेसबुक Facebook, इन्स्टाग्राम Instagram, ट्विटर Twitter, व्हॉट्सअॅप Whatsapp, टेलिग्राम Telegram, सिग्नल Signal, शेअरचॅट Share Chat यांच्यासह वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करू शकता.

72 Gopinath Munde Birth Anniversary
७२वी गोपीनाथ मुंडे जयंती 
थोडं पण कामाचं
  • गोपीनाथ मुंडे जयंती
  • मुंडेंची ७२वी जयंती
  • मुंडे यांच्या स्मृतींना अभिवादन करणारे मराठमोळे फोटो, ग्राफिक्स शेअर करा

Gopinath Munde Birth Anniversary भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ता ते नेता असा प्रवास करणारे लोकनेते अशा शब्दात गोपीनाथ मुंडे यांचे वर्णन करता येईल. ते परळी विधानसभा मतदारसंघाचे १९८० पासून २००९ पर्यंत प्रतिनिधित्व करत होते. त्यांनी २००९ पासून २०१४ पर्यंत बीड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मुंडे लोकसभेत २०१२ मध्ये भारतीय जनता पार्टीचे उपनेते झाले. याआधी १४ मार्च १९९५ ते १९९९ या काळात गोपीनाथ मुंडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. सभा गाजवणारे आणि गर्दी खेचणारे उत्तम वक्ते अशी त्यांची ख्याती होती.

गोपीनाथ मुंडे हे मूळचे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामधील परळी तालुक्याच्या नाथ्रा गावचे होते. त्यांचे घराणे राजकारणात नव्हते. संघर्ष करीत ते लोकसभेचे सदस्य झाले. महाराष्ट्रात पक्षाला तळागाळातील लोकांपर्यंत नेण्याचे काम त्यांनी केले. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी १२ डिसेंबर २०१० रोजी पुण्यातील समारंभात गोपीनाथ मुंडे यांचा लोकनायक असा गौरव केला होता.  

प्रमोद महाजन यांच्याशी असलेली मैत्री आणि मराठावाडा विद्यापीठात नामांतराच्या मुद्यावर केलेले आंदोलन या दोन गोष्टींमुळे मुंडे राजकीय वर्तुळात अधिकाधिक सक्रीय झाले. महाजन-मुंडे जोडीने भाजपची पाळेमुळे महाराष्ट्रात रुजविली. मराठवाड्याच्या विकासात योगदान देणारे लोकप्रिय नेते अशी ख्याती असलेल्या गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. मुंडेंचा जन्म १२ डिसेंबर १९४९ रोजी झाला तर मृत्यू दिल्लीत एका कार अपघातामध्ये ३ जून २०१४ रोजी झाला. केंद्र सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेऊन दोन आठवडे पण झाले नव्हते तोच मुंडे यांचे अपघाती निधन झाले. जेमतेम ६४ वर्षांचे आयुष्य जगलेल्या या नेत्याची लोकप्रियता मराठवाड्यात आजही प्रचंड आहे. यामुळेच आज गोपीनाथ मुंडे यांच्या ७२व्या जयंती निमित्त मुंडे समर्थक एकमेकांना आपल्या लाडक्या नेत्याचे फोटो, व्हिडीओ, लोकप्रिय वाक्य पाठवून त्यांच्या कार्याचे स्मरण करत आहेत. आपणही जयंतीचे औचित्य साधून गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना अभिवादन करणारे मराठमोळे फोटो, ग्राफिक्स फेसबुक Facebook, इन्स्टाग्राम Instagram, ट्विटर Twitter, व्हॉट्सअॅप Whatsapp, टेलिग्राम Telegram, सिग्नल Signal, शेअरचॅट Share Chat यांच्यासह वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी