पाण्याच्या दुर्भिक्षामुळे लातूरमध्ये गणपती विसर्जन अशक्य 

लातूर
Updated Sep 11, 2019 | 19:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

महाराष्ट्रातील बहुतांशी भागात गेल्या काही महिन्यांपासून थैमान घातले असले तरी मराठवाडा मात्र अजूनही कोरडा आहे.  दोन वर्षांपूर्वी रेल्वेने पाणी पुरवण्याची वेळ आलेल्या लातूरमध्ये यंदा पुन्हा पाणी टंचाई निर्माण झाल

latur water crises ganesh visarjan 2019
लातूरमध्ये यंदा गणेश विसर्जन अशक्य  |  फोटो सौजन्य: Instagram

लातूर : महाराष्ट्रातील बहुतांशी भागात गेल्या काही महिन्यांपासून थैमान घातले असले तरी मराठवाडा मात्र अजूनही कोरडा आहे.  दोन वर्षांपूर्वी रेल्वेने पाणी पुरवण्याची वेळ आलेल्या लातूरमध्ये यंदा पुन्हा पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पहिल्यांदा गणेशमूर्तांचे विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला आहे.  यंदा लातूरमध्ये गणेशोत्सवाचा शतक महोत्सवी सोहळा साजरा केला जात आहे. 

लातूर शहरला दोन वर्षांपूर्वी रेल्वेने पाणी पुरवठा करण्यात आला होता. त्यावेळी पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. तशीच परिस्थिती यंदाही निर्माण झाली आहे.  लातूर शहर आणि परिसरातील विहिरीत आणि धरणात पाण्याचाथेंब नाही. ज्या ठिकाणी पाणी आहे तेथे ते राखून ठेवावे लागणार असल्यामुळे गणेश विसर्जन न करता त्या मूर्ती दान करण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. 

नेहमीप्रमाणे नियोजित मार्गाने गणेश विसर्जनाची मिरवणूक सर्व मंडळांनी काढावी पण त्या गणपतीच्या मूर्तींचे विसर्जन करू नये, असे आवाहन लातूरच्या महापालिका उपायुक्तांनी केली आहे. यंदा पाऊस चांगला होऊन पाण्याचा प्रश्न दूर होईल अशी अपेक्षा होती. पण गणपतीच्या दहा दिवसात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे ज्यांनी घरात गणपती बसवले आहेत, त्यांनी वर्षभर घरीत मूर्ती ठेवावी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी जवळच्या ग्रामीण भागात गणेश मूर्ती दान कराव्यात. तसेच जे गणेश मूर्ती तयार करतात त्या कारागिरांना या मूर्ती दान कराव्यात तसेच कोणीही मूर्ती घेतल्या नाही तर शेवटचा पर्याय म्हणून महापालिकेला या मूर्तींचे दान करावे. शहरात कोणत्याही ठिकाणी विसर्जन करण्याचा आग्रह धरू नये, असेही उपायुक्तांनी आपल्या आवाहनात म्हटले आहे. 


सध्या लातूरमध्ये सप्टेंबरच्या अखेरपर्यंत नळाने पुरवठा करता येईल इतके पाणी शिल्लक आहेत. हे पाणी पिण्यासाठीचे आहे. ज्या विहिरीमध्ये दरवर्षी गणेश विसर्जन होते त्यात पुरेसे पाणी नाही. जे पाणी आहे, ते इतर वापरासाठी होईल, गणेश विसर्जन केल्याने पाणी प्रदुषित होईल.  महापालिकेच्या या आव्हानानंतर गणेश मंडळाची जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत गणेश मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद देत मान्य केले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...