[VIDEO]: राहुल गांधींच्या सभेतील महत्वाचे मुद्दे

लातूर
सुनिल देसले
Updated Oct 13, 2019 | 14:29 IST

Rahul Gandhi Rally: काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्राच्या राजकीय मैदानात प्रचारासाठी उतरले आहेत. राहुल गांधीची पहिली प्रचारसभा लातूरमध्ये पार पडली. राहुल गांधींची संपूर्ण सभा पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा.

Rahul Gandhi
राहुल गांधी (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
 • विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी राज्यात 
 • राहुल गांधींची लातूरमध्ये जाहीर सभा
 • राहुल गांधींची संपूर्ण सभा पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा
 • काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधींची पहिली सभा

लातूर: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी महाराष्ट्रात आहेत. राहुल गांधी आज आफल्या तीन जाहीर प्रचारसभा घेणार आहेत. यापैकी पहिली सभा लातूर, दुसरी सभा चांदिवली आणि तिसरी सभा धारावी येथे होणार आहे. राहुल गांधींच्या लातूर येथील सभा नुकतीच पार पडली. यावेळी राहुल गांधी यांनी भारतीय जनता पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.

 

राहुल गांधींच्या सभेतील महत्वाचे मुद्दे

 1. जितके या देशाचे विभाजन कराल तितकं देशाचं नुकसान होईल, बेरोजगारी वाढेल
 2. उद्या काय होणार हे शेतकऱ्यांना माहिती नाहीये, कर्ज कसं फेडावं हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतोय पण नीरव मोदी आरामात आहे
 3. निवडणुकीत काश्मीर, कलम ३७०, चांद्रयान मोहिमेवर बोलतील मात्र, मुख्य मुद्द्यांवर भाष्य करणार नाहीत
 4. मीडिया देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतींचं आहे पण आता सुरुवात झाली आहे, पाहा पुढील सहा-सात महिन्यांत काय अवस्था होईल
 5. चीनच्या सैनिकांनी घुसखोरी केली त्याबद्दल चीनच्या अध्यक्षांना विचारलं का? नाही विचारलं
 6. इस्रोची निर्मिती काँग्रेसने केली, रॉकेट दोन दिवसात चंद्रावर पोहोचलं नाही तर अनेक वर्षांची मेहनत आहे त्यामागे
 7. चांद्रयान मोहिमेवर राहुल गांधीचं भाष्य, श्रेय घेणाऱ्या मोदींना लगावला टोला
 8. निवडणुकीत बेरोजगारीवर भाष्य करणार नाही 
 9. नोटबंदी नंतर भ्रष्ट लोक बँकांच्या रांगेत दिसले का?
 10. नोटबंदी केली पण काळा पैसा भारतात परत आला का?
 11. शेतकऱ्यांनी कर्ज फेडले नाही तर त्याला कारागृहात टाकलं जातं मात्र, श्रीमंतांना वेगळा न्याय दिला जातोय
 12. उद्योगपतींचं साडे पाच लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं मोदींनी
 13. अंबानी, अदानी यांच्या सारख्या १५ लोकांचं कर्ज नरेंद्र मोदींनी माफ केलं
 14. राज्यात किती शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं? नाही झालं ना? पण तरी तुम्ही शांत आहात
 15. देशात काय सुरु आहे? हे तुम्ही समजून घ्या
 16. देशात इतकं काही होत आहे मात्र, मीडियात जनतेचे मुद्दे ऐकायला मिळणार नाहीत
 17. शेतकऱ्यांना विचारा, त्यांचं उत्तर असतं मोदींनी बरबाद केलं
 18. कुठल्याही तरुणाला विचारा काय करतोस? त्याचं उत्तर असतं काही नाही
 19. कर्ज माफ झालं का?, अच्छे दिन आले का? राहुल गांधींचा सवाल
 20. राहुल गांधी यांच्या भाषणाला सुरुवात
 21. व्यासपीठावर राहुल गांधी यांच्यासोबत बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, राजीव सातव, बसवराज पाटील, अमित देशमुख, मधुकरराव चव्हाण उपस्थित
 22. राहुल गांधी यांचे व्यासपीठावर आगमन
 23. बसवराज पाटील यांच्यासाठी राहुल गांधींची सभा


राहुल गांधी यांच्या प्रचारसभा

 1. पहिली सभा - औसा, लातूर - दुपारी २.१५ वाजता 
 2. दुसरी सभा - चांदिवली, मुंबई - सायंकाळी ५ वाजता 
 3. तिसरी सभा - धारावी, मुंबई - सायंकाळी ६.३० वाजता 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या झालेल्या दारूण पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाचं अध्यक्ष पद सोडलं. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते प्रथमच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी