याला म्हणतात जिद्द ! १०५ वर्षीय आजोबा अन् ९५ वर्षाच्या आजीनं कोरोनाला हरवलं

लातूर
भरत जाधव
Updated Apr 29, 2021 | 09:25 IST

देशासह राज्यात कोरोना महामारीचं संकट दिवसेंदिवस वाढू लागलं आहे. सर्व राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. यामुळे ठाकरे सरकारसमोर नागरिकांचा जीव वाचवण्याचं मोठं आव्हान आहे.

The 105-year-old grandfather and the 95-year-old grandmother beat Cor
१०५ वर्षीय आजोबा अन् ९५ वर्षाच्या आजीनं कोरोनाला हरवलं  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • वृद्ध दाम्पत्याने कोरोनाला दिली मात
  • जिद्दीने कोरोनावर देता येते मात
  • लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुखांनी फोटो केला शेअर

लातूर : देशासह राज्यात कोरोना महामारीचं संकट दिवसेंदिवस वाढू लागलं आहे. सर्व राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. यामुळे ठाकरे सरकारसमोर नागरिकांचा जीव वाचवण्याचं मोठं आव्हान आहे.  मात्र राज्यात होणाऱ्या रुग्णालयातील दुर्घटना, औषधांचा होणारा तुटवड्याने सरकारची चिंता वाढवली आहे. राज्यातील कोरोना रुग्णाची संख्या दररोज  वाढू लागली आहे. रुग्णालयांमधील प्रशासन यंत्रणा रुग्णांची व्यवस्था करण्यास असमर्थ ठरत आहेत. रुग्णालयात रुग्णांना बेड नाहीत, ऑक्सिजन, औषधांचा तुटवड्यामुळे अनेक कोरोना रुग्णांनी आपल्या जीवनाची यात्रा संपवली. दरम्यान संसर्गाची साखळी तुटावी यासाठी राज्य सरकारने राज्यातील लॉकडाऊन परत वाढवला आहे. अशा नकारात्मक वातावरणात लातूरमधून एक आशादायी बातमी हाती आली आहे. तेथील एका वृद्ध दाम्पत्याने कोरोनाला धोबी पछाड दिला आहे. 

कोरोनाची दुसरी लाट शहरी भागासह ग्रामीण भागात पोहोचली आहे, तेथील आरोग्य सुविधा कमकुवत असताना आता कोरोनाने ती व्यवस्था अजून खिळखिळी बनली आहे. दुसऱ्या लाटेतील कोरोना पहिल्या लाटेपेक्षा अधिक  प्रभावी असून यावेळी बरे होण्याच्या दरात घट झाली आहे. तर कोरोनाबाधित होण्याचं आणि मृत्यूंच्या प्रमाणात वाढ झाली आहे. सगळीकडे भीतीदायक वातावरण असताना लातूरमधील या सुखद घटनेमुळे अनेकांच्या मनात सकारात्मकता येईल. कारण कोरोनावर मात देणारे लातूरमधील काटगाव तांडा येथील चव्हाण वृद्ध दाम्पत्याचे वय ऐकून आपल्या भुवया नक्कीच उंचवातील. एकीकडे कोरोनाचं नाव जरी ऐकलं तर मनात भीती भरुन हातपाय गळू जातात, अशा महाकाय महामारीवर १०५ वर्षाचे धेनू उमाजी चव्हाण आणि ९५ वर्षाच्या मोताबाई चव्हाण यांनी कोरोनाला नमवलं आहे. त्यांनी कोरोनाशी केलेल्या झुंजीमध्ये चव्हाण दाम्पत्य विजयी झाल्यानंतर अनेक माध्यमांनी त्यांचे फोटो व्हायरल केले आहेत.

इतकंच काय लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनीही आजी-आजोबांचा फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली. सध्या सर्वत्र नकारात्मक वातावरण तयार झाले असताना ही धीर देणारी, कोरोना बाधितांचं मनोधैर्य वाढवणारी बातमी असल्याचं धीरज देशमुख यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. १०५ वर्षीय धेनू उमाजी चव्हाण आणि ९५ वर्षाचे मोताबाई चव्हाण हे वृद्ध दाम्पत्य लातूरमधील विलासराव देशमुख इस्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स या हॉस्पीटलमध्ये दहा दिवसांसाठी अॅडमीट होते. त्यांच्या मुलांनी या दोघांना २५ मार्च रोजी हॉस्पीटलमध्ये दाखल केलं होतं. त्यावेळी दोघांना श्वास घेण्यास त्रास होत होता. आजी-आजोबाला हॉस्पीटलमध्ये दाखल केले त्यावेळी त्यांची तपासणी केली असता. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. मग आम्ही त्यांना ऑक्सिजन सपोर्ट दिलं. यासह त्यांना वेळोवेळी अँण्टी व्हायरल डोस दिले असल्याची माहिती डॉ.सुधीर देशमूख यांनी दिली.

राज्यातील कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, तसेच रुग्णालयता बेड, ऑक्सिजन, रेमडिसिविर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धडपड आपण पाहत आहोत. स्मशानभूतीही मृतदेहांवरील अंत्यसंस्कारासाठी रांग लागल्याचेही आपण पाहिलं. दुसरीकडे सोशल मीडियावरही भावपूर्व श्रद्धांजलीच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात पडत आहेत. अशा भयाण वातावरणात लातूरमधील चव्हाण दाम्पत्याचा विजय सर्वांना सुखद धक्का देणारा आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी