सेना सोडताना सुभाष साबणेंची काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीका: पायात पाय घालण्यात दोन्ही पक्षांची पीएचडी

लातूर
भरत जाधव
Updated Oct 03, 2021 | 14:54 IST

शिवसेना सोडताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीने सुभाष साबणे यांना रडू कोसळलं.  यादरम्यान साबणे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली.

Subhash Sabane strongly criticized the Congress and the NCP
सुभाष साबणे  |  फोटो सौजन्य: फेसबुक
थोडं पण कामाचं
  • अनेक लोकांची इच्छा आहे की, शिवसेनेने आता या महाविकास आघाडीतून बाहेर यावे.
  • शिवसेना सोडताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीने सुभाष साबणे यांना रडू कोसळलं.
  • आमच्या कार्यकर्त्याने काळे झेंडे दाखवले तर त्यांना बुटासह मारण्याचा प्रयत्न झाला.

नांदेड: भाजपने देगलूर बिलोली जागेसाठी शिवसेनेतील नाराज नेते सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सुभाष साबणे शिवसेनेत नाराज होते त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेशाची घोषणा केली. शिवसेना सोडताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीने सुभाष साबणे यांना रडू कोसळलं.  यादरम्यान साबणे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त होती. आता या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. भाजपकडून सुभाष साबणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

का केली टीका अन् का वाहिले अश्रू 

माध्यमांशी बोलताना साबणे यांच्या डोळ्यात पाणी भरुन आले. ते म्हणाले, मी 1984 पासन आज इतके वर्ष मी शिवसेनेमध्ये घालवली. आज अशोक चव्हाण यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून मला शिवसेना सोडावी लागत आहे. शिवसेना सोडताना अतिशय वाईट वाटत आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी मला खूप प्रेम दिल जे मागितले ते दिल उद्धव साहेबांनी पण खूप दिले, अशी भावना सुभाष साबणे यांनी व्यक्त केली. 

आयुष्यात जय पराजय होत राहतो पण माझ्या कार्यकर्त्याला बुटाने मारण्याचा जो प्रकार झाला त्या मनाला वेदना देऊन गेल्या. राज्यात काँग्रेस संपली होती. उद्धव साहेबांमुळे तुम्ही सत्तेवर आलात आणि तुम्ही आम्हाला विसरता, असा सवाल साबणे यांनी अशोक चव्हाण यांना केला. आमच्या नेत्यांचे फोटो बॅनरवर देखील लावले जात नाहीत. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्याने काळे झेंडे दाखवले तर त्यांना बुटासह मारण्याचा प्रयत्न झाला, असे साबणे म्हणाले. आमच्या सदस्यांना डीपीडीसी मधून निधी दिला जात नाही, असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

 चव्हाणांचा शिवसेना संपवण्याचा प्रयत्न 

शिवसेना संपवण्याचा प्रयत्न नांदेड जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाण करत आहेत. उद्धव ठाकरे हे सज्जन आहेत त्यांना डावपेच माहीत नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यात मास्टर झालेली लोक आहेत. पायातपाय घालण्यात आणि राजकारणात हे पीएचडी झालेली माणस आहेत. शिवसेनेचे यामुळे मोठे नुकसान आहे.

अनेक शिवसैनिक महाविकास आघाडीला कंटाळलेत

माझ्यासारखी परिस्थिती अनेकांची आहे. माझ्या सारख्या अनेक लोकांची इच्छा आहे की, शिवसेनेने आता या महाविकास आघाडीतून बाहेर यावे. आमदार आणि खासदारांची हीच इच्छा आहे. मी जर सहन करून बसलो असतो तर आता काँग्रेसला मतदान मागितले असते आणि मग 2024 ला कुणासाठी मतदान मागितले असते, असा सवाल सुभाष साबणे यांनी केला आहे. आज पंज्याला मतदान द्या अस म्हणायचं आणि मग 2024 ला कुणाल मतदान द्या म्हणून सांगायचे, असाही सवाल सुभाष साबणे यांनी केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी