Beed : परळीसाठी 100 कोटींचा निधी आणला कोणी? ताई अन् भाऊ म्हणतो मी-मी; श्रेयवादावरुन मुंडे बहिण-भावात रस्सीखेच

लातूर
भरत जाधव
Updated Jul 17, 2022 | 06:30 IST

परळीतील (Parli) दोन उड्डाणपुलांच्या कामासाठी केंद्रीय मंत्रालयाने (Central Ministries) 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्याच्या श्रेयवादावरुन आता मुंडे बहिण आणि भावात वाद सुरू झाल्याचं चित्र आहे. दोघांनी ट्विट (Tweet) करत आपणच निधी आणला याचा दावा करत आहेत.

 Munde brother-sister tussle over credit for bringing funds
निधी आणण्याच्या श्रेयवादावरुन मुंडे बहिण-भावात रस्सीखेच  |  फोटो सौजन्य: Times Now

बीड : परळीतील (Parli) दोन उड्डाणपुलांच्या कामासाठी केंद्रीय मंत्रालयाने (Central Ministries) 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्याच्या श्रेयवादावरुन आता मुंडे बहिण आणि भावात वाद सुरू झाल्याचं चित्र आहे. दोघांनी ट्विट (Tweet) करत आपणच निधी आणला याचा दावा करत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी हा निधी आपल्यामुळे मिळाल्याचं सांगितलं आहे. तर दुसरीकडे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनीही निधी आपल्यामुळेच मिळाल्याचा दावा केला आहे. 

परळी शहरातील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूलाचे विस्तारीकरण आणि चौपदरीकरण तसेच अंबाजोगाई-लातूर मार्गावरील बीड जिल्हयाच्या हद्दीतील रस्त्याचे चौपदरीकरणासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यावरुन या दोघांनीही आपल्यामुळेच हा निधी मिळाल्याचा दावा केला असून गडकरींचे आभार मानले आहेत. 

पंकजा मुंडे यांचे ट्वीट

परळी शहरातील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूलाचे विस्तारीकरण आणि चौपदरीकरण तसेच अंबाजोगाई-लातूर मार्गावरील बीड जिल्हयाच्या हद्दीतील रस्त्याचे चौपदरीकरण यासाठी 100 कोटी रूपयाचा निधी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व खा. डॉ.प्रितम मुंडे यांच्या मागणीनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केला आहे. याबद्दल पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत गडकरी यांचे आभार मानले आहेत.  

धनंजय मुंडेंचा दावा

श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूल चौपदरीकरण व राज्य मार्ग 361 एफ वरील परळी शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते औष्णिक विद्युत प्रकल्पाचे प्रवेशद्वार या रस्त्याचे व त्यावरील रेल्वे उड्डाण पुलासह चौपदरीकरण करणे ही दोन कामे समाविष्ट करण्यात आली असून यासाठी 100 कोटी रुपये याच आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आले आहेत. या दोन्ही कामांची लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून, धनंजय मुंडे यांनी समस्त परळीवासीयांच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. 


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी