Crime : एक कोटी रुपयांच्या विमा पॉलिसीसाठी बायकोनं नवऱ्याच्या डोक्याचा केला भुगा, पत्नीसह दोन जणांना अटक

लातूर
भरत जाधव
Updated Jun 14, 2022 | 16:38 IST

पण आपल्या भविष्यातील जीवन सुकर बनविण्यासाठी विमा पॉलिसी घेत असतो. पण ह्याच विमा पॉलिसी तुमचा जीव घेऊ शकतील किंवा तुमच्या मृत्यूचे कारण बनू शकतील असं कधी तुम्ही ऐकलं का? नाही ना परंतु लातूरमधील एका व्यक्तीला विमा पॉलिसीमुळे जीव गमवावा लागलाय. मृत व्यक्तीने एक कोटी रुपयांची विमा पॉलिसी काढली होती विम्याची किंमत पाहून त्याच्या बायकोच्या मनात लोभ निर्माण झाला आणि तिने आपल्या नवऱ्याला जिवाशी संपवलं. ही घटना लातूरमधील रेनापूर येथे घडली आहे. 

Wife kills husband for insurance policy money
विमा पॉलिसीच्या पैशांसाठी पत्नीनं पतीची केली हत्या   |  फोटो सौजन्य: Times Now

लातूर : आपण आपल्या भविष्यातील जीवन सुकर बनविण्यासाठी विमा पॉलिसी घेत असतो. पण ह्याच विमा पॉलिसी तुमचा जीव घेऊ शकतील किंवा तुमच्या मृत्यूचे कारण बनू शकतील असं कधी तुम्ही ऐकलं का? नाही ना परंतु लातूरमधील एका व्यक्तीला विमा पॉलिसीमुळे जीव गमवावा लागलाय. मृत व्यक्तीने एक कोटी रुपयांची विमा पॉलिसी काढली होती विम्याची किंमत पाहून त्याच्या बायकोच्या मनात लोभ निर्माण झाला आणि तिने आपल्या नवऱ्याला जिवाशी संपवलं. ही घटना लातूरमधील रेनापूर येथे घडली आहे. 

मृत व्यक्तीचे ओळख पटली असून याचे नाव मंचक गोविंद पवार(45) असून तो लातूरमधील रेनापूरमध्ये राहत होता. मंचक पवार यांचा मृतदेह 11 जूनला  अहमदनगर महामार्गावरील बीड पिंपेरगाव रस्त्यावर आढळला होता. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला. हाती आलेल्या माहिती नुसार, या मंचक पवार यांचा खून त्यांच्याच पत्नीने दोन जणांच्या मदतीने केला आहे. ही हत्या करण्यासाठी मंचक पवार यांची पत्नी गंगाबाई (37) यांनी दोन जणांना दोन लाख रुपये दिले होते. 

दरम्यान पोलिसांनी आरोपी गंगाबाई आणि इतर दोन जणांना अटक केली असून पुढील तपास करत आहेत. या घटनेविषयी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, गंगाबाई ह्यांनी सुरुवातील पोलिसांना चुकीची माहिती देत तपास भरकटविण्याचा प्रयत्न केला. आपल्या नवऱ्याचा खून नसून अपघात झाल्याचा भासवण्याचा प्रयत्न गंगाबाईने केला होता. परंतु आरोपी पत्नी गंगाबाईच्या जबाबामध्ये पोलिसांना संशय वाटल्यानं त्यांनी तिची पुढील चौकशी पोलीस स्टेशनमध्ये केली असता, त्यावेळी तिने आपणच खून केल्याचं कबुल केलं आहे.

विम्याचे पैसे मिळावेत यासाठी तिने आपल्या पतीचा खून केल्याचं तिने सांगितले. पोलीस तपासादरम्यान असे आढळून आले की, मृत मंचक पवार यांच्या डोक्यावर अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती, त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला होता. या कामासाठी आरोपी पत्नीने दोन मारेकऱ्यांना पैसे दिले होते. गुन्हा करण्यासाठी त्यांना प्रत्येकी दोन लाख रुपये दिले होते. दरम्यानभारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अलीकडे, एप्रिल 2022 मध्ये, एका 48 वर्षीय महिलेला तिच्या पतीचा लोखंडी रॉडने डोक्यात वारंवार वार करून खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. काही दिवसांपुर्वी  एप्रिल 2022 मध्ये एक 48 महिलेला आपल्या पतीच्या डोक्यावर लोखंडी गजाने हल्ला करत त्याचा खून केला होता. या  प्रकरणी पत्नीसह तिच्या दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली होती. याच प्रकारे मे 2022 मध्ये लग्नानंतर अवघ्या 36 दिवसांनी एका महिलेने तिच्या प्रियकरासह तिच्या चार मित्र आणि नातेवाईकांसह पतीची हत्या केली होती.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी