Pankaja Munde : नवरात्रौत्सवात पंकजा मुंडे 'झिंग झिंग झिंगाट'वर थिरकल्या; डान्सचा Video व्हायरल

लातूर
Updated Sep 30, 2022 | 12:36 IST

Pankaja munde dance in beed : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' सिनेमाची क्रेज अद्यापही कमी झालेली दिसत नाहीये. या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत इतिहास रचला. अजय-अतुलच्या ‘झिंगाट’ गाण्याने संपूर्ण महाराष्ट्राला ‘सैराट’ करून सोडले आहे. सात वर्षानंतरही या गाण्याची क्रेझ कमी होत नाही. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे गुरुवारी परळी येथे दांडिया उत्सवात डान्स करतानाचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

थोडं पण कामाचं
  • सहा वर्षानंतरही सैराट चित्रपटातील झिंगाट गाण्याची क्रेझ कायम
  • पंकजा मुंडे यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
  • झिंगाटच्या गाण्यावर भन्नाट डान्स केला.

बीड  : नागराज मंजुळेच्या सैराट चित्रपटातील झिंगाट गाण्यानं सहा वर्षांपूर्वी तरुणानांच नाही तर नेते मंडळींनाही वेड लावलं आहे. सोहळा कोणताही असो झिंगाट गाणं झालंच पाहिजे असा आग्रह लोकांचा असतोच असतो. लग्न असो किंवा हळद किंवा एखादा समारंभ झिंगाट गाण्याशिवाय तो अपूर्णच राहातो. आता चक्क भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे ही झिंगाट गाण्यावर नाचण्याचा मोह आवरला नाही. (Pankaja Munde : Pankaja rocked on 'Zing Zing Zingat' during Navratri festival; Viral dance video)

माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा झिंगाटच्या गाण्यावर भन्नाट डान्स केला. त्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. परळी शहरातील विद्यानगर भागात सार्वजनिक दुर्गोत्सव समितीने दांडिया उत्सवाचे कार्यक्रम करण्याचे आयोजन करण्यात आले होते. 

अधिक वाचा : Mumbai Crime News: अंधेरीत हॉटेलच्या रूममध्ये मॉडेलनं संपवलं आयुष्य, सुसाईट नोटमध्ये केला मोठा खुलासा

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. मात्र आज परळीत त्यांचा एक अनोखा अंदाज समोर आला आहे. परळी मध्ये आयोजित करण्यात आलेल्या दांडिया महोत्सवात पंकजांनी झिंगाट गाण्यावर डान्स केला. तरुणाईचा हट्ट आणि उत्सवाचे वातावरण पाहून पंकजांना देखील आपला मोह आवरता आला नाही. नवरात्र उत्सवानिमित्त पंकजा मुंडे सध्या परळी मध्ये ठाण मांडून आहेत. विविध ठिकाणी आयोजित केलेल्या दांडिया उत्सवास त्या भेटी देत आहेत. आज देखील परळी शहरातील विद्यानगर भागात सार्वजनिक दुर्गोत्सव आणि दांडिया उत्सव समितीने आयोजित केलेल्या महोत्सवात त्यांनी हजेरी लावली होती. आणि याज दरम्यान पंकजा मुंडे यांचा हा अनोखा अंदाज दिसून आला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी