राहुल गांधींची 'भारत जोडो' यात्रा आज महाराष्ट्रात पोहोचणार, असा असणार यात्रेचा मार्ग

लातूर
Updated Nov 07, 2022 | 21:27 IST

तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र-तेलंगणा या राज्यांमधून प्रदीर्घ प्रवास केल्यानंतर या यात्रेचा महाराष्ट्रातील टप्पा सुरू होत आहे. या यात्रेच्या स्वागतासाठी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, यात्रेचे महाराष्ट्राचे समन्वयक, माजी मंत्री बाळासाहेब थोरात तसेच माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, रमेश बागवे, नसीम खान, पक्षसंघटनेतील पृथ्वीराज साठे, चारुलता टोकस, मोहन जोशी, सचिन सावंत, अतुल लोंढे यांच्यासह अनेक नेते नांदेडमध्ये दाखल झाले आहेत.

थोडं पण कामाचं
  • देगलूर ते नांदेड हा मार्ग सात ते 12 नोव्हेंबरपर्यंत पाच दिवस हा मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • यात्रेदरम्यान राहुल गांधींची दोन ठिकाणी सभा होणार
  • नांदेडमधील जवळपास नऊ मार्गावरील वाहतूकही वळवण्यात आली आहे.

मुंबई :  नांदेड : काँग्रेस नेते (Congress leader)खासदार (MP) राहुल गांधी (Rahul Gandhi)यांच्या नेतृत्वात कन्याकुमारीहून (Kanyakumari) सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) दोन महिने पूर्ण होत आहेत. दोन महिन्यानंतर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात (Maharashtra) पोहोचणार आहे. दक्षिण भारताचा प्रवास केल्यानंतर भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातील नांदेडात पोहोचणार आहे. तेलंगणाच्या सीमेवरील देगलूरहून( Degalur) निघाल्यानंतर ही यात्रा नांदेडात (Nanded) पोहोचणार आहे.( Rahul Gandhi's 'Bharat Jodo' Yatra will reach Maharashtra today, the route of the Yatra will be like this)

अधिक वाचा  : द व्यक्त करतो आणि माझा शब्द मागे घेतो, सॉरी - अब्दुल सत्तार

दरम्यान यात्रा निघाल्यानंतर देगलूर ते नांदेड हा मार्ग सात ते 12 नोव्हेंबरपर्यंत पाच दिवस हा मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गानं वळवण्यात आली आहे. नांदेडमधील जवळपास नऊ मार्गावरील वाहतूकही वळवण्यात आली आहे. 

अधिक वाचा  : सुळेंच्या मागे ठामपणे उभे राहण्याऐवजी मुंडेंनी दिला मीडियाल

तेलंगणाच्या सीमेवरील देगलूर शहरात सायंकाळी या यात्रेचे महाराष्ट्र प्रदेश तसेच नांदेड जिल्हा काँग्रेसच्या वतीने भव्य स्वागत करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा अशा पाच जिल्ह्यातून 384 किलोमीटरचा प्रवास या यात्रेदरम्यान राहुल गांधी करणार आहेत. या काळात दोन मोठ्या सभा सुद्धा होणार आहेत. राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील मार्गावर ज्या दोन मोठ्या सभा होणार आहेत, त्यातील पहिली सभा 10 नोव्हेंबरला नांदेडमध्ये होईल, तर दुसरी सभा 18 नोव्हेंबरला शेगावात होणार आहे. 

bharat jodo yatra

कसा असेल राहुल गांधींचा प्रवास 

  • देगलूरहून  - वेळ - 7.30 सायंकाळ - येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नगरपरिषद शेजारी देगलूर येथे आगमन व स्वागत  
  • रात्री 9 वाजता पदयात्रेला सुरुवात वन्नाळीकडे प्रयाण.
  • यादगरी साहिबजादे बाबा जोरावर सिंगजी फतेह सिंगजी गुरुद्वारा येथे पोहचणार. येथे रात्रीचा मुक्काम केला जाणार आहे. 

गेल्या 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरू झालेली ही यात्रा 12 राज्यांतून मार्गक्रमण करीत जम्मु-काश्मीरमध्ये नवीन वर्षामध्ये पोहोचणार आहे. वैविध्याने नटलेल्या भारत देशाची एकात्मता, अखंडता व बंधूभाव अबाधित राखण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून सुरू झालेल्या या यात्रेला अनेक राजकीय पक्षांसह देशातील विविध संघटना व सामाजिक संस्थांनी समर्थन दिले आहे. अशी माहिती राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच यात्रेच्या नांदेड जिल्ह्यातील स्वागत-नियोजनाचे प्रमुख अशोक चव्हाण यांनी दिली.  

अधिक वाचा  :  सत्तार यांनी दिलेल्या शिवीनंतर सुळे यांची पहिली प्रतिक्रिया

तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र-तेलंगणा या राज्यांमधून प्रदीर्घ प्रवास केल्यानंतर या यात्रेचा महाराष्ट्रातील टप्पा सुरू होत आहे. या यात्रेच्या स्वागतासाठी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, यात्रेचे महाराष्ट्राचे समन्वयक, माजी मंत्री बाळासाहेब थोरात तसेच माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, रमेश बागवे, नसीम खान, पक्षसंघटनेतील पृथ्वीराज साठे, चारुलता टोकस, मोहन जोशी, सचिन सावंत, अतुल लोंढे यांच्यासह अनेक नेते नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे  राहुल गांधींच्या या यात्रेत शिवसेने नेते आदित्य ठाकरे देखील सहभागी होणार आहेत.

 राज्यभरातून कार्यकर्ते राहुल गांधींना साथ देण्यासाठी या यात्रेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे यात्रामार्गावरील सर्व हॉटेल, मंगल कार्यालये कार्यकर्त्यांना राहण्यासाठी बुक करण्यात आली आहेत. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते ही यात्रा भव्य करण्यासाठी झटत आहेत. महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल, भाकप, पीरिपा इत्यादी पक्षांसह वेगवेगळ्या संघटनाही भारतयात्रींचे स्वागत करणार आहेत.राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून व प्रत्यक्ष सहभागातून निघालेल्या भारत जोडो यात्रेला आतापर्यंत मोठा प्रतिसाद मिळाला. सर्वसामान्य लोक या यात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी