बीड : बीडच्या परळी शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनेत वाढ होते आहे. एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाच्या अंगावर खाजेचं पावडर टाकून वृद्धाची दोन लाखाची रोकड लंपास करण्यात आलीय.
हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. परळी शहरातील सोमेश्वर सृष्टी येथे राहणारे प्रभाकर शिंदे यांनी आपल्या मुलाला देण्यासाठी वैद्यनाथ बँकेतून दोन लाख दहा हजार रुपयांची रोकड काढली होती.
ही रोकड घेऊन घरी परतत असताना पाळत ठेवून असणाऱ्या चोरट्यांनी त्यांच्या अंगावर खाजेची पावडर टाकून पैशाची बॅग लंपास केली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडालीय.
याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने चोरट्यांकडून पोलिसांना आव्हान दिले जात आहे.