उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील १० महत्त्वाचे मुद्दे

मुंबई
रोहित गोळे
Updated Jul 08, 2022 | 17:29 IST

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन बंडखोर आमदार आणि काही महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. जाणून घ्या उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे.

10 important points in uddhav thackeray press conference
उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील १० महत्त्वाचे मुद्दे  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
 • उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत केले महत्त्वाचे खुलासे
 • उद्धव ठाकरे अद्यापही संघर्षावर ठाम
 • बंडखोर आमदारांबाबत उद्धव ठाकरे पाहा काय म्हणाले

मुंबई: शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 'मातोश्री' या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन सध्या ज्या घडामोडी सुरु आहेत त्याबाबत भाष्य केलं. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. जाणून घ्या त्यापैकी १० महत्त्वाचे मुद्दे.  

उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे:

 1. धनुष्यबाण हा शिवसेनेचा आहे नि शिवसेनेचाच राहील!
 2. एका गोष्टीचा नक्की अभिमान होता आणि आहे, शिवसेनेने आज पर्यंत राजकीय पार्श्वभूमी आहे की नाही याचा विचार न करता साध्या साध्या माणसांना मोठं केलं.
 3. ज्यांना या साध्या माणसांच्या मेहनतीने मोठेपण मिळालं, मोठी झाली ती माणसं गेली. ज्यांनी यांना मोठं केलं ती मोठ्या मनाची आणि मोठ्या हिमतीची साधी माणसं आज ही शिवसेनेसोबत आहेत. ही जोपर्यंत सोबत आहे तोपर्यंत शिवसेनेच्या भवितव्याला कोणीही धोका पोहचवू शकत नाही. 
 4. आमदार जाऊ शकतो पक्ष जाऊ शकत नाही. अनेक संभ्रम निर्माण केले जात आहे जनतेने आणि शिवसैनिकांनी अजिबात या भ्रमाच्या भोपळ्यात अडकू नका.
 5. जे आमदार माझ्या सोबत राहिले त्यांचे मी जाहीर कौतुक करतो... काही वाट्टेल ते होवो आम्ही नाही हटणार, या जिगरीची माणसं जिथे असतात तिथेच विजय असतो! न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे. न्याय मंदिरावर विश्वास आहे...
 6. शिवसेनेचे काही वाकडं होऊ न देण्याची ताकद आजही शिवसैनिकांच्या मनगटात आहे.
 7. ११ जुलैची सुनावणी देशाच्या लोकशाहीचं भवितव्य ठरवणार आहे.
 8. मी यापूर्वीही आव्हान केले होते, सुरतेला जाऊन बोलण्यापेक्षा, इथेच 'सुरत' दाखवून बोलायचे होते. ज्यांनी ठाकरे कुटुंबीयांचा अपमान केला, अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून बसताहात, आता लोकांना कळेल तुमचं प्रेम खरे की खोटे!
 9. मला सर्वसामान्य लोकांना धन्यवाद द्यायचे आहेत. मेसेज करून, फोन करून ते आपला पाठींबा दर्शवत आहेत. विधानसभेच्या निवडणुका व्हायला हव्यात, आम्ही चूक केली असेल तर जनतेचा निर्णय शिरसावंद्य आहे!
 10. सन्मानाने बोलवावं तर यापूर्वीही आवाहन  केलेलं आहे. आमच्याबद्दलच प्रेम हे अडीच वर्ष कुठे गेले होते. जे आमच्याशी अत्यंत वाईट पद्धतीने वागले त्यांना मिठ्या मारताना तुम्हाला आनंद वाटत असेल तर, तुमचा आनंद तुम्हाला लखलाभ असो.

अधिक वाचा: 'ही' देवेंद्र फडणवीसांसाठी धोक्याची घंटा?

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या या पत्रकार परिषदेनंतर आता भाजप आणि शिंदे गटातील आमदार नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी