Maharashtra Winter Assembly Session: अधिवेशनाआधीच मंत्रालयातील 10 जणांना कोरोनाची लागण; 3500 जणांची केली RT-PCR चाचणी

मुंबई
भरत जाधव
Updated Dec 22, 2021 | 11:50 IST

Maharashtra legislature Assembly : राज्य विधीमंडळाचे ( legislature Assembly) हिवाळी अधिवेशन आजपासून मुंबईत (Mumbai) सुरू होत आहे. विधीमंडळात कोरोनाने (Corona) शिरकाव केल्याने हिवाळी अधिवेशनात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Winter Assembly Session
हिवाळी अधिवेशनाआधी कोरोनाचा गोंधळ; 8 पोलीस पॉझिटिव्ह   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • तिसऱ्या लाटेची भीती आणि मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे यंदा मुंबईत हिवाळी अधिवेशन होत आहे.
  • काल महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूचे 825 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
  • ओमायक्रॉन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे 3500 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली.

Maharashtra legislature Assembly : मुंबई : राज्य विधीमंडळाचे ( legislature Assembly) हिवाळी अधिवेशन आजपासून मुंबईत (Mumbai) सुरू होत आहे. विधीमंडळात कोरोनाने (Corona) शिरकाव केल्याने हिवाळी अधिवेशनात भीतीचे वातावरण पसरले आहे. अधिवेशनापूर्वी राज्यात ओमायक्रॉन(Omicron) आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे 3500 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात सर्व आमदार (MLA), विधान सभागृहातील कर्मचारी, पोलीस (Police) कर्मचारी या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात 10 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून यात पॉझिटिव्ह आढळलेल्यांमध्ये 8 पोलीस कर्मचारी आहेत. तर 2 जण मंत्रालयातील कर्मचारी आहेत.

दरम्यान, काल महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूचे 825 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ज्यात ओमायक्रॉनचे 11 रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे 14 जणांचा मृत्यू काल झाला आहे. महाराष्ट्रात आतापर्यत 66 लाख 50 हजार 965 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 1 लाख 41 हजार 367 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

राज्यात ओमायक्रॉनचे 65 रुग्ण

आरोग्य विभागानुसार, राज्यात मंगळवारी ओमायक्रॉनचे 11 रुग्ण आढळली आहेत. मुंबई विमानतळावरील तपासादरम्यान, 8 जण ओमायक्रॉनची लागण झाल्याचं आढळून आले.  दरम्यान, राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बुधवारपासून मुंबईत सुरू होत आहे. पाच दिवसाच्या अधिवेशनात ओबीसी आरक्षण, टीईटी, म्हाडा व आरोग्य विभागातील पेपरफुटी, मराठा आरक्षण, शेती नुकसान भरपाई, ड्रग्ज प्रकरण, एसटी महामंडळाचे विलीनीकरण आदी प्रमुख मुद्दे गाजणार आहेत. सोबतच महिला सुरक्षेसंदर्भातील बहुचर्चित शक्ती कायदा पारित केला जाणार आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांची निवडही या अधिवेशनात होण्याची शक्यता आहे.

हिवाळी अधिवेशन परंपरेने नागपुरात होते. मात्र, तिसऱ्या लाटेची भीती आणि मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे यंदा मुंबईत होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत अजूनही ठीक नसल्याने ते अधिवेशनादरम्यान सभागृहात किती काळ उपस्थित राहणार याबाबतही प्रश्न आहे. त्यामुळे विरोधकांचा सामना करण्याबरोबरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे महाविकास आघाडी सरकार विरोधकांचे हल्ले कसे परतावून लावणार याची उत्सुकता आहे.

पाच दिवसाचे अधिवेशन 

22 ते 28 डिसेंबर दरम्यान शनिवार-रविवार सुट्टी आल्याने प्रत्यक्षात पाच दिवसच अधिवेशन होणार आहे. अधिवेशनाचा कालावधी कमी केल्याने सरकार भ्रष्टाचार आणि चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप विरोधी पक्ष भाजपने केला आहे. त्यामुळे भाजप सरकारला विविध मुद्द्यांवर घेरण्याची शक्यता आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी